AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : भाजपच शिवसेनेला दगा देणार होता?, राष्ट्रवादीला काय निरोप आला होता?; शरद पवार यांच्या आत्मचरित्रात मोठा गौप्यस्फोट

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकातून खळबळजनक खुलासे करण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. या पुस्तकातून भाजपचा पर्दाफाश करण्यात आला आहे.

Sharad Pawar : भाजपच शिवसेनेला दगा देणार होता?, राष्ट्रवादीला काय निरोप आला होता?; शरद पवार यांच्या आत्मचरित्रात मोठा गौप्यस्फोट
sharad pawarImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 03, 2023 | 6:48 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं ‘लोक माझे सांगाती’ हे आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. पवार यांचं हे राजकीय आत्मचरित्र आहे. लोक माझे सांगाती हे त्यांचं दुसरं राजकीय आत्मचरित्र आहे. त्यातून त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 2019मध्ये नेमकं काय घडलं होतं? राज्याच्या राजकारणात काय खलबते घडत होती? यावर शरद पवार यांनी प्रकाशझोत टाकताना भाजपची झोप उडवणारी माहितीही दिली आहे. 2019मध्ये भाजपला शिवसेनेला वगळून सरकार स्थापन करायचं होतं आणि त्यासाठी राष्ट्रवादीला निरोप होता, असा सर्वात मोठा खुलासा शरद पवार यांनी पुस्तकातून केला आहे. त्यामुळे भाजपलाच शिवसेनेला शह द्यायचा होता हे स्पष्ट होत होतं.

शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकातून सांगितला महाविकास आघाडी बनण्याआधीचा किस्सा स्पष्ट केला आहे. शिवसेना आणि भाजप युतीतून लढल्यानंतर सरकार बनवताना शिवसेनेला बाजूला ठेवून सरकार बनवता येईल का यासाठी भाजप प्रयत्न करत होता. उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची मागणी बोलून दाखवल्यानंतर भाजपकडून हे प्रयत्न केले जात होते, असा खळबळजनक गौप्यस्फोट या पुस्तकातून करण्यात आला आहे. त्यामुळे भाजपलाच शिवसेनेला दगा द्यायचा होता हे स्पष्ट होत असल्याचं या आत्मचरित्रातून उघड होत आहे.

मोदींना कळवलं होतं

आम्हालाही अनौपचारिकरित्या सोबत घेऊन सत्ता बनवता येईल असा निरोप होता. मी प्रत्यक्ष त्या चर्चेत सहभागी नव्हतो. मात्र दोन्हीकडच्या प्रतिनिधींमध्ये याबाबत चर्चा झाली होती. मला या गोष्टी कळताच भाजपसोबत जाणे सोयीचे होणार नाही म्हणून मीच स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना स्पष्ट नकार कळवला होता. दिल्लीत जाऊन मी मोदींना स्वतः भेटलो होतो आणि आम्ही तुमच्यासोबत येऊ शकत नाही अस मोदींना कळवलं होत, अस शरद पवार यांनी पुस्तकात म्हटलंय.

शपथविधीवर भाष्य

अजित पवार यांनी केलेल्या बंडावरही त्यांनी या पुस्तकात लिहिलं आहे. 2019मध्ये माझ्या नावाने बंड सुरू झालं होतं. पण त्याला माझा पाठिंबा नव्हता. सकाळी 6.30 वाजता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्याची माहिती मला मिळाली, असं पवार यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

त्याचा अंदाज नव्हता

कोणत्याही संघर्षाशिवाय उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे महाविकास आघाडीची सत्ता गेली असं सांगत पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवरच या पुस्तकातून टीका केली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर शिवसेनेत बंड होईल, शिवसेना आपलं नेतृत्व गमावेल, याचा आम्हाला अंदाज नव्हता. तसेच उद्धव ठाकरे यांनी कोणताही संघर्ष न करता राजीनामा दिल्याने आमचं सरकार गेलं, असं पुस्तकात म्हटलं आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.