मुंबई महापालिका निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’?, शेलारांचे संकेत; शिवसेनेसाठी धोक्याची घंटा
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता बिहार पॅटर्न मुंबई महापालिकेत राबवण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. तसे संकेतच भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी दिल्याने शिवसेनेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. (bjp will implement bihar pattern in mumbai corporation election?)
मुंबई: बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर आता बिहार पॅटर्न मुंबई महापालिकेत राबवण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या आहेत. तसे संकेतच भाजप नेते, आमदार आशिष शेलार यांनी दिल्याने शिवसेनेसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. (bjp will implement bihar pattern in mumbai corporation election?)
आशिष शेलार यांनी बिहार निवडणुकीच्या निकालावर भाष्य करतानाच बिहार पॅटर्न आता मुंबई महापालिकेत राबवण्याचे संकेतही दिले. शिवसेना काँग्रेससोबत गेली आहे. महाराष्ट्रातील या आघाडीचे पडसाद बिहारमध्ये उमटले. बिहारी जनतेला काँग्रेसेने शिवसेनेला सोबत घेणं आवडलं नाही. त्यामुळे काँग्रेसला बिहारमध्ये सपाटून मार खावा लागला. तेच आता मुंबईत घडेल. मुंबईकर मुंबई महापालिका निवडणुकीतही शिवसेनेची साथ सोडेल, असा दावा शेलार यांनी केला आहे. तुम्ही महापालिका निवडणुकीतही काँग्रेससोबत राहा. जनता तुमचा निश्चित पराभव करेल, असा टोला त्यांनी लगावला आहे.
महापालिका निवडणूक मुंबई भाजपाध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वातच लढवू. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना केलेली कामे आम्ही जनतेपर्यंत घेऊन जाणार आहोत. आम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणूक कामाला लागलो असून फडणवीस या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत, असंही त्यांनी सांगितलं. तसेच मुंबई महापालिकेसाठीची रणनीती आजच सांगणार नाही, असं सांगून शेलार यांनी मुंबईत परिवर्तन होणार असल्याचेच संकेत दिले आहेत.
काय आहे बिहार पॅटर्न
शेलार यांनी बिहार पॅटर्न मुंबई महापालिकेत लागू करण्याचे संकेत दिले आहेत. या बिहार पॅटर्ननुसार प्रचाराची धुरा फडणवीस यांच्याकडेच राहील. त्यासाठी निवडणुकीची खास रणनीती बनवण्यात येईल. बुथ लेव्हलपर्यंतची ही रणनीती राहणार आहे. विकासाची मुद्दे, फडणवीस सरकारने केलेली कामे आणि ठाकरे सरकारचं अपयश आदी मुद्दे जोरकसपणे मांडण्यावर भाजपचा भर राहणार आहे. बिहार निवडणुकीतही फडणवीस यांनी हीच रणनीती वापरली होती. तिच रणनीती मुंबई महापालिकेत वापरली जाणार आहे. फडणवीस यांनी बिहार निवडणुकीत आक्रमकपणे प्रचार केला होता. चौकसभांचा धडाका लावला होता. तोच पॅटर्न मुंबईत राबवला जाणार असल्याचे संकेत भाजपमधून मिळत आहेत. भाजपमध्ये अनेक नेते जनतेवर थेट प्रभाव पाडू शकणारे आहेत. दुसरीकडे शिवसेनेत उद्धव ठाकरे वगळता इतर नेत्यांमध्ये मतदारांवर पाहिजे तितका प्रभाव पाडू शकत नाहीत. मात्र, शिवसेनेचं संघटन ग्रासरुटपर्यंत मजबूत असल्याने शिवसेनेच्या किल्ल्यांना भाजप कितपत खिंडार पाडेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरुhttps://t.co/J9shtPb8y3@ShivSena @BJP4Maharashtra @OfficeofUT @NCPspeaks @rautsanjay61 @ShelarAshish
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 11, 2020
संबंधित बातम्या:
आमची टांग वर झाल्यास भूमंडळ हालते; संजय राऊत यांचा इशारा
तीन पक्षांचं सरकार पण काँग्रेसला बळकट करायचेय, बाळासाहेब थोरातांना बळ द्या: पृथ्वीराज चव्हाण
आशिष शेलारांनी महापालिका निवडणुकीचं शंख फुंकलं, BMC वर झेंडा फडकवण्याची तयारी सुरु
(bjp will implement bihar pattern in mumbai corporation election?)