Breaking : सह्याद्री अतिथीगृहातील मोठा स्लॅब कोसळला, मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले

सह्याद्री अतिथीगृहातील 4 क्रमांकाच्या हॉल बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी मंत्र्यांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं.

Breaking : सह्याद्री अतिथीगृहातील मोठा स्लॅब कोसळला, मंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले
सह्याद्री अतिथीगृहाचा स्लॅब कोसळला, आदित्य ठाकरे बचावले
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 8:08 PM

मुंबई : सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वरील मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले आहेत. बैठक सुरु असतानाच बाहेर स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. सह्याद्री अतिथीगृहातील 4 क्रमांकाच्या हॉल बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. यावेळी मंत्र्यांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या दुर्घटनेतून सर्वजण सुखरुप बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे. (Sahyadri Guest House slab suddenly collapsed, Minister Aditya Thackeray was safe)

सह्याद्री अतिथीगृहात मुख्यसभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळले. आज संध्याकाळी 4.45 मिनिटांनी सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकिय अधिकाऱ्यांच्या बैठका सह्याद्री अतिथीगृहात घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरच शोभेचे मोठे झुंबर त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळले. अचानक झालेल्या या दूर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र दूर्घटना जीवघेणी होती त्यामुळे सह्याद्री अतिथीगृहातील सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना आणि सर्व अधिकाऱ्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आलं आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आलीय.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना

मंत्री आदित्य ठाकरे यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. कोरोनावर मात करुन त्यांनी पुन्हा एकदा आपल्या खात्याचा कारभार पाहायला सुरुवात केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांचा विविध विषयांवर अधिकारी आणि संबंधित लोकांची बैठकांचा सिलसिला सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आणि आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा ते घेत आहेत. ‘AMC वेलारुसु जी यांच्यासोबत आज मुंबईच्या PSA ऑक्सिजन युनिट, रिबॉटलिंग प्लांट, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन स्टोरेजसंदर्भात आढावा घेतला. मुंबईचा पालकमंत्री म्हणून मुंबईला तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनची कमतरता न भासो म्हणून ही तयारी करत आहोत’, अशी माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

झोपडपट्टीधारकांना नवीन घराचा ताबा

‘SRA च्या श्री साई सुंदर नगर पुनर्वसन योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील पात्र झोपडीधारकांना नवीन घरांचा ताबा दिला जाणार आहे. त्याकरिता आज प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांसाठी चावी वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी खासदार राहुल शेवाळे, श्रद्धा जाधव आणि SRA चे CEO सतीश लोखंडे जी उपस्थित होते’, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.

संबंधित बातम्या :

‘स्पुटनिक’साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत चर्चा सुरु, ग्लोबल टेंडर रद्द झालं तरी मुंबईला लस मिळणार

Corona Vaccine | एकही कंपनी पात्र ठरली नाही, अखेर मुंबई महापालिकेचं ग्लोबल टेंडर रद्द

Sahyadri Guest House slab suddenly collapsed, Minister Aditya Thackeray was safe

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.