वडील न्यायाधीश झाल्याने वकिली सोडून मुंबई गाठली, अडवाणींच्या रथयात्रेने प्रभावित; मंगलप्रभात लोढा कसे घडले? वाचा

देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक अर्थात बिल्डर म्हणून भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांची ओळख आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष म्हणूनही ते सर्वपरिचित आहेत. (Mangalprabhat Lodha)

वडील न्यायाधीश झाल्याने वकिली सोडून मुंबई गाठली, अडवाणींच्या रथयात्रेने प्रभावित; मंगलप्रभात लोढा कसे घडले? वाचा
Mangalprabhat Lodha
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 9:29 AM

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत बांधकाम व्यावसायिक अर्थात बिल्डर म्हणून भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांची ओळख आहे. भाजपचे मुंबईचे अध्यक्ष म्हणूनही ते सर्वपरिचित आहेत. मात्र, ते राजकारणात नेमके कसे आले? वकिलीचा व्यवसाय सुरू असतानाही त्यांना मुंबई का गाठावीशी वाटली? याबाबत अनेकांना माहीत नाही. मंगलप्रभात लोढा यांच्या या अंतरंगावर टाकलेला हा प्रकाश. (builder and politician, know about bjp leader Mangal Prabhat Lodha)

थोडक्यात

मंगलप्रभात लोढा यांचा जन्म 1 डिसेंबर 1955चा. जैन कुटुंबात जन्मलेले मंगलप्रभात लोढा हे स्वातंत्र्य सैनिक आणि निवृत्त न्यायाधीश गुमान माल लोढा यांचे सुपूत्र आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलं. मंगल प्रभात लोढा हे मुंबईतील उच्चभ्रू मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 1995 पासून सलग पाच वेळा मलबार हिल या उच्चभ्रू मतदारसंघातून ते निवडून येत आहेत. मुंबईतील सर्वात मोठा लोढा ग्रुपचे ते संस्थापक आहेत. देशातील सर्वात श्रीमंत बिल्डर्सपैकी एक म्हणून मंगलप्रभात लोढा ओळखले जातात. लोढा यांचे वडील न्यायाधीश म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. तेही आमदार, विरोधी पक्षनेते आणि खासदार झाले होते. घरात लोढा यांना राजकीय पार्श्वभूमी होती. पण ते कधी राजकारणात जातील असं त्यांना वाटलं नव्हतं. तसा विचारही त्यांनी केला नव्हता.

म्हणून वकिली सोडली

लोढा यांनी राजस्थानात एलएलबीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर सनद घेतल्यावर त्यांनी वकिलीही सुरू केली. पण उच्च न्यायालयात वडील न्यायाधीश झाल्याने तिथेच वकिली करणं योग्य नसल्याने त्यंनी वकिली सोडली. त्यानंतर त्यांनी थेट मुंबईच गाठली.

रिअल इस्टेटमध्ये नोकरी

मुंबईत आल्यावल लोढा यांनी वकिली केली नाही. त्यांनी एका खासगी रिअल इस्टेट फर्ममध्ये नोकरी पत्करली. चार वर्षे या फर्ममध्ये त्यांनी काम केलं. त्यानंतर त्यांनी बिल्डिंग मटेरिअल पुरवण्याचं काम सुरू केलं. 1982मध्ये एका मित्राच्या मध्यस्थीने त्यांनी नालासोपाऱ्यात जमीन खरेदीविक्रीचा व्यवसाय त्यांनी सुरू केला. या व्यवसायात जम बसला होता.

अन् राजकारणाकडे वळले

लोढा लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते. जोधपूरमध्ये कॉलेजला असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नवनिर्माण आंदोलनात भागही घेतला होता. त्यामुळे मुंबईत आल्यावर राजकारणापासून लांब असले तरी त्यांच्यातला कार्यकर्ता काही स्वस्थ बसलेला नव्हता. 1990च्या काळात लालकृष्ण अडवाणी यांनी देशभरात रथयात्रा काढली. रामजन्मभूमीसाठी काढलेल्या या रथयात्रेकडे लोढा आकर्षित झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा संगाचे काम सुरू केले. कारसेवेसाठी अयोध्येलाही गेले. त्यावेळी त्यांना अटकही झाली होती. पुढे 1993मध्ये त्यांनी थेट भाजपमध्ये काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे संघटन मंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.

पहिल्यांदा विजयी

1995मध्ये त्यांच्या राजकीय आयुष्याला पहिल्यांदा टर्निंग पॉइंट मिळाला. 1995मध्ये त्यांना मलबारहिलमधून उमेदवारी देण्यता आली. काँग्रेसचे तेव्हाचे नगरविकास मंत्री बी. एस. देसाई यांचा हा मतदारसंघ होता. त्यामुळे विजयाची काही खात्री नव्हती. पण लोढांनी ही निवडणूक निकराने लढवली आणि देसाईंनी पराभूत करून जायंट किलर ठरले.

देसाईंचे बोल खरे ठरले

मतमोजणी सुरू असताना काँग्रेसचे उमेदवार बीए देसाई मतदान केंद्रावर हजर होते. मंगलप्रभात लोढा यांचे वडीलही मतदान केंद्रावर आले होते. लोढा यांचा विजय झाल्यावर बीए देसाई हे लोढांच्या वडिलांजवळ आले आणि म्हणाले, मलबारहिलमध्ये भाजपचा विजय होतोय. याचा अर्थ भाजप संपूर्ण मुंबईत जिंकला असणार. देसाई यांचे हे बोल तंतोतंत खरे ठरले. मुंबईच नव्हेतर भाजपने अख्खा महाराष्ट्र काबीज केला होता. शिवसेना-भाजप युती सत्तेत आली होती.

31 हजार 960 कोटींची संपत्ती

हुरुन रिपोर्ट आणि ग्रोही इंडिया यांचा सर्वेक्षण अहवाल ‘ग्रोही हुरुन इंडिया रियल इस्टेट रिच लिस्ट 2019’ (Grohe Hurun India Real Estate Rich List for 2019) हा प्रसिद्ध झाला होता. 2019मध्ये प्रसिद्ध झालेल्या या रिपोर्टमध्ये देशातील श्रीमंत बांधकाम व्यावसायिकांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यात लोढा परिवाराची एकूण संपत्ती 31,960 कोटी रुपये इतकी असल्याचं नमूद करण्यात आलं. 2019 मध्ये लोढा परिवाराची संपत्ती 18 टक्क्यांनी वाढली. शंभर जणांच्या यादीत अन्य 99 जणांपेक्षा 12 टक्के संपत्तीचा भाग एकट्या लोढांकडे आहे.

दुसऱ्या क्रमांकावरील डीएलएफचे राजीव सिंह यांची संपत्ती 25 हजार 80 कोटी रुपये आहे. यंदा त्यांच्या संपत्तीत 42 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षी ते श्रीमंत व्यावसायिकांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर होते. एम्बेसी प्रॉपर्टी डेव्हलपमेंट्सचे जितेंद्र विरवानी हे 24 हजार 750 कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. बिल्डरांच्या या संपत्तीचं विवरण 30 सप्टेंबर 2019 पर्यंतच्या संपत्तीवरुन करण्यात आलं आहे. (builder and politician, know about bjp leader Mangal Prabhat Lodha)

संबंधित बातम्या:

पहाटेच्या शपथविधीतून थेट पवारांना भेटले, पाचवेळा आमदार, चौथ्यांदा मंत्री; वाचा, कोण आहेत राजेंद्र शिंगणे

संघर्षशील नेता, कामगारांचा बुलंद आवाज; वाचा, कोण आहेत भाई जगताप?

नेता, अभिनेता, ‘एकच छंद गोपीचंद’; वाचा, कोण आहेत गोपीचंद पडळकर?

(builder and politician, know about bjp leader Mangal Prabhat Lodha)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.