चुन चुन के मारेंगे.. म्हणणाऱ्या संजय गायकवाडांना अंबादास दानवे चॅलेंज देणार? बुलढाण्यात अस्वस्थता
शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा कोण घेणार, यावरून शिवसेना आणि शिंदेसेना यांच्यात सध्या वाद रंगलाय. शिवसेना नेत्यांनी शिंदे गटावर टीकासत्र सुरु केल्यानंतर संजय गायकवाड यांनी शिवसेनेला इशारा दिला होता.
बुलढाणाः शिवसैनिकांना शोधून शोधून मारणार, अशी भाषा करणाऱ्या शिंदे (CM Ekanth Shinde) गटातील आमदार संजय गायकवाडांना (Sanjay Gayakwad) आज अंबादास दानवे काय चॅलेंज देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. बुलडाण्यात आज शिवसैनिकांचा मेळावा आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांची इथे विशेष उपस्थिती आहे. भाषण दुपारी असेल पण बुलढाण्यातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. आधीच शिवसेनेतील दुफळीमुळे अनेक कार्यकर्ते विभागले गेले आहेत. त्यातच दोन नेत्यांतील शाब्दिक चकमकीनंही गंभीर रुप धारण केलंय. त्यामुळे अंबादास दानवे काय बोलणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
काय घडलं होतं ?
3 सप्टेंबर रोजी बुलडाणा कृषी उत्पन्न बाजार समितीत सुरु असलेल्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार कार्यक्रमात शिंदे गटातील कार्यकर्ते आणि ठाकरे गटातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला झाला होता. या राड्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलाल तर चुन चुन के और गिन गिन के मारेंगे अशी डायलॉगबाजी संजय गायकवाड यांनी केली होती.
त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून यावर प्रत्युत्तर आले. बीडमध्ये अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.
शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचा आहे, असं वक्तव्य दानवेंनी केलं होतं.
दरम्यान, अंबादास दानवे येणार आहेत, यावरील प्रतिक्रिया विचारल्यास संजय गायकवाड यांनी काहीशी नरमाईची भाषा केली आहे.
दानवेंना जे काही बोलायचंय ते बोलु द्या, नंतर पाहू, असं वक्तव्य गायकवाड यांनी केलंय.
आमचे कार्यकर्ते तिकडे जाणार नाहीत. मला तसा वेळही नाही. पोलिसांना ताण देणार नाही. ते जर काही बोलले तर पाहू , असं वक्तव्य आमदार संजय गायकवाड यांनी केलंय..
शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा कोण घेणार, यावरून शिवसेना आणि शिंदेसेना यांच्यात सध्या वाद रंगलाय. शिवसेना नेत्यांनी शिंदे गटावर टीकासत्र सुरु केल्यानंतर संजय गायकवाड यांनी शिवसेनेला इशारा दिला होता.