दिल्लीत खलबते, मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री स्पष्टच बोलले
राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्याकडे शिंदे गट तसेच भारतीय जनता पक्षातील अनेक आमदारांचं लक्ष लागलं आहे. पहिल्या टप्प्यातील विस्तारात संधी न मिळालेले इच्छुकांचे डोळे दिल्लीच्या दिशेने लागले आहेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली.
नवी दिल्ली : राज्याच्या मंत्रिमंडळ (cabinet expansion)विस्ताराकडे डोळे लावून बसलेल्या आमदारांसाठी चांगली बातमी आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी दिल्लीत आहेत. या दौऱ्यात विविध बैठकांमध्ये ते सहभागी होणार आहे. परंतु त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. यासंदर्भात टीव्ही ९ शी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
राज्यातील मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या दुसऱ्या टप्प्याकडे शिंदे गट तसेच भारतीय जनता पक्षातील अनेक आमदारांचं लक्ष लागलं आहे. पहिल्या टप्प्यातील विस्तारात संधी न मिळालेले इच्छुकांचे डोळे दिल्लीच्या दिशेने लागले आहेत. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही ९ शी बोलताना भूमिका स्पष्ट केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यांसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत विविध मुद्यांवर चर्चा होणार आहे. अर्थात त्या बैठकीत राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे.
सहकार क्षेत्रात सुधारणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, सहकार क्षेत्रात ज्या सुधारणा आणायच्या आहेत, त्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत चर्चा होणार आहे. या सुधारणांनंतर सहकार क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर बदल होतील. या बदलाचा फायदा राज्यातील सर्व जनतेला होणार आहे. यामुळे कोणाचेही नुकसान होईल, असे म्हणणे चुकीचे आहे. राज्यातील जनतेला जे चांगले ते आम्ही देणार आहोत.
कोणाचा असणार दावा
शिंदे गटातील आमदारांमध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, प्रताप सरनाईक, संजय गायकवाड, सुहास कांदे, भरत गोगावले यांचा मंत्री म्हणून समावेश होऊ शकतो. अपक्ष आमदार बच्चू कडूही यांचीही वर्णी लागू शकते. तर भाजपच्या गोटातून संजय कुटे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर, राम शिंदे, नितेश राणे, देवयानी फरांदे, प्रवीण दरेकर आदी नावांची मंत्रिपदासाठी चर्चा आहे.
अधिवेशनापुर्वीच होणार होता विस्तार
राज्याच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तो झाला नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. तर शिवसेना पक्षाविषयी महत्त्वाची सुनावणी सुप्रीम कोर्ट तसेच निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. या सुनावणीतील घडामोडींनुसार, मंत्रिमंडळ विस्तार होईल, असेही म्हटले जात होते.