माझ्या फंदात पडू नकोस; नारायण राणेंचा संजय राऊतांना थेट इशारा
संजय राऊतांच्या भूमिकेवर आगपाखड करताना ते म्हणाले, माझ्याविरोधात बोलतो, मात्र समोर दिसल्यानंतर मला कसे आहात, असे विचारतो. संजय राऊत यांची मानसिक स्थिती चांगली आहे? असा खोचक सवाल उपस्थित करीत राणेंनी राऊतांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही.
मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. संजय राऊत संपादकीय लिहितो, मात्र समोर आला की नमस्कार करतो. उद्धव ठाकरेना सांगतोस शिवसैनिक आहे. मात्र शरद पवारांना गुपचूप जाऊन भेटतो. टीका कर कार्यकारी संपादक राहशील, रोजदांरीवर संपादक आहेस. पण माझ्या फंदात पडू नकोस, असा थेट इशारा देत नारायण राणेंनी संजय राऊतांवर टीकेची तोफ डागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त केल्याप्रकरणी नारायण राणेंवर अटकेची कारवाई झाली. त्यावर संजय राऊतांनी खरमरीत प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या टीकेची राणेंनी शेलक्या शैलीतच उत्तर दिले. (Central minister Narayan Rane’s direct warning to Shivsena leader Sanjay Raut)
जनआशिर्वाद यात्रेदरम्यान राऊतांवर शरसंधान
जन आशीर्वाद यात्रेदरम्यानच त्यांनी राऊतांवर शरसंधान साधले. तसेच शिवसेनेच्या अन्य काही नेत्यांचाही समाचार घेतला. संजय राऊतांच्या भूमिकेवर आगपाखड करताना ते म्हणाले, माझ्याविरोधात बोलतो, मात्र समोर दिसल्यानंतर मला कसे आहात, असे विचारतो. संजय राऊत यांची मानसिक स्थिती चांगली आहे? असा खोचक सवाल उपस्थित करीत राणेंनी राऊतांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. संजय राऊत टीका करून फक्त कार्यकारी संपादक राहिल्याचे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी राऊतांना माझ्या फंदात न पडण्याचा थेट इशारा दिला. मला तुम्हाला उद्योजक बनवायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
सिंधुदुर्गातील शिवसेना नेत्यांवरही घणाघाती टीका
भाजपने मला केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. याचा योग्य वापर करून मी जनतेला लाभ मिळवून देणार असल्याची हमी नारायण राणेनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान दिली. याचवेळी त्यांनी शिवसेना आणि शिवसेनेच्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पदाधिकार्यांवर टीकास्त्र सोडले. शिवसेना सरकारी मालमत्ता विकायला लागली आहे. पण आम्ही ती विकू देणार नाही, असा इशारा त्यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला. शिवसैनिकांची यातायात झाली असल्याचे नमूद करीत त्यांनी सिंधुदूर्गातील शिवसेना आमदारांवर हल्लाबोल चढवला. आमदार कुडाळचा आणि काय फुशारक्या मारतात, अशा शब्दांत नारायण राणेंनी शिवसेना आमदार वैभव नाईक यांना टोला लगावला. तसेच मंत्री असूनही त्यांनी काही केलं नाही, आता काय करणार? विकासासाठी दोन हजार कोटी कुठून आणणार? हे कसले राज्यमंत्री? आमच्याकडे मंत्रिपद आहे. त्यामुळे थोडे दिवस गप्प बसा, अशा शब्दांत राणेंनी शिवसेना आमदार दीपक केसरकर यांना त्यांचे नाव न घेता इशारा दिला. (Central minister Narayan Rane’s direct warning to Shivsena leader Sanjay Raut)
Aurangabad Jobs: स्किल डेव्हलपमेंट कोर्स करायचाय? विद्यापीठाच्या केंद्रातून आजवर 200 विद्यार्थ्यांना रोजगारhttps://t.co/pH9goFKLBX#BAMU | #Skilldevlopment |
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 29, 2021
इतर बातम्या
काही धागेदोरे हाती लागले असतील म्हणूनच ईडीने नोटीस बजावली असेल; प्रविण दरेकरांचं सूचक विधान
श्रद्धा कपूर आणि रोहनच्या लग्नाच्या बातमीवर वडील शक्ती कपूर यांची प्रतिक्रिया