‘सरस्वतीने फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं!’ वक्तव्यावर छगन भुजबळ ठाम

देवी सरस्वतीच्या अनुषंगाने केलेल्या भुजबळांच्या वक्तव्यावरुन चर्चांना उधाण, अखेर पत्रकार परिषद घेत भुजबळांनी स्पष्टी केली भूमिका

'सरस्वतीने फक्त 3 टक्के लोकांना शिकवलं!' वक्तव्यावर छगन भुजबळ ठाम
छगन भुजबळImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 29, 2022 | 1:44 PM

चंदन पुजाधिकारी, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chagan Bhulbal) यांनी पत्रकार परिषद घेतली. सरस्वती देवीच्या (Godess Sarswati) अनुषंगाने केलेल्या वक्तव्यावर त्यांनी पत्रकार परिषदेतून विरोधकांना उत्तर दिलं. मी आपल्या वक्तव्यावर ठाम आहे, मी देशविरोधी वक्तव्य केलेलं नाही, असं यावेळी भुजबळ यांनी स्पष्ट केलं. शिवाय आपल्या वक्तव्यामागचा नेमका हेतू कोणता होते, हे देखील त्यांनी सांगितलं. ते नाशिकमध्ये (Nashik News) बोलत होते.

देवी सरस्वतीने फक्त 3 टक्के लोकांना (ब्राह्मणांना) शिकवलं, असं वक्तव्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. त्यानंतर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यावर पत्रकार परिषद घेऊन भुजबळ यांनी सविस्तर भूमिका मांडली.

छगन भुजबळ यांनी म्हटलंय, की सत्यशोधक समाजाला 150 वर्ष पूर्ण, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रम मी बोलत होते. मी कोणतंही चुकीचं वक्तव्य केलेलं नाही. शाळेतल्या पहिल्या दिवशी आपण सरस्वती देवीची पूजा करतो. पण आपण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांची पूजा आपण का करत नाही?

हे सुद्धा वाचा

ज्यांनी आपल्यासाठी शिक्षणाची कवाडं उघडी केली, प्रत्यक्ष शिकवलं, आपल्याला शिकवण्यासाठी ज्यांना प्रचंड विरोध सहन करावा लागला, शेणाचा मार खाल्ला, अशांची पूजा आपण केली पाहिजे, असं मत भुजबळ यांनी पुन्हा एकदा व्यक्त केलं.

पाहा व्हिडीओ :

या सगळ्या महान व्यक्तींआधी बहुजन समाजाला शिक्षणापासून दूर का ठेवलं गेलं? ब्राह्मणांच्या मुलींनाही शिक्षणासाठी दूर ठेवण्यात आलं होतं, असंही भुजबळ यांनी यावेळी म्हटलं. सावित्रीबाईंनी पहिली शाळा खाडली, तेव्हा त्यात चार मुली या ब्राह्मणांच्या चार मुली होत्या, असं ते म्हणाले. त्यामुळे सरस्वती देवीची पूजा का करायची? ज्यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी संघर्ष केला, अशांची पूजा करा, एवढाच माझा मुद्दा होता, असं भुजबळ यांनी म्हटलंय.

कुणाचे फोटो काढा किंवा काढू नका, हा माझा मुद्दा नव्हता. आम्हीही हिंदू आहोत. मी ही देवीच्या दर्शनाला जातो. तुम्ही तुमच्या आयुष्यात, घरात कुठल्या देवाची पुजा करा हा तुमचा प्रश्न. फुले, शाहू आंबेडकरांनी सांगितलं की अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका.शाहू, फुले, आंबेडकरांना बाजूला ठेवून आपण जे करतो आहोत, ते योग्य नाही, एवढचं माझं म्हणणंय, असं भुजबळ यांनी म्हटलं.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.