‘बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिकांच्या तुकड्या गेल्या नाहीत’, पुन्हा राजकीय घमासान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच अयोध्या दौऱ्यावरुन आलेत. पण आता चंद्रकांत पाटलांनी बाबरी मशिदी संदर्भात शिवसेनेवर सवाल केलेत. बाबरी मशीद पाडली त्यावेळी शिवसैनिक नव्हते, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन जोरदार हल्लाबोल केला.

'बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिकांच्या तुकड्या गेल्या नाहीत', पुन्हा राजकीय घमासान
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 11:34 PM

मुंबई : “बाबरी मशीद पाडण्यासाठी शिवसैनिकांच्या तुकड्या गेल्या नाहीत”, असं भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील बोलले आणि ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत पाटलांसह भाजपवर तुटून पडले. उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन आता बाबरीच्या खंदकातून अनेक उंदीर बाहेर पडत असल्याचं म्हटलं. कोणी पक्ष म्हणून नाही तर, विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी मशीद पाडल्याचं चंद्रकांत पाटलांचं म्हणणंय. पण बाळासाहेबांचं महत्त्व कमी करण्यासाठी भाजपचा डाव असल्याचं उद्धव ठाकरे म्हणालेत. 6 डिसेंबर 1992 ला अयोध्येतली बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जवळपास 28 वर्षांनी अंतिम निकाल लागला आणि जमीन राम मंदिरासाठी हिंदू पक्षकारांना देण्यात आली. पण आता चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर, उद्धव ठाकरे संतापलेत.

भाजपच्या सुंदरलाल भंडारींचा किस्सा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही आपल्या जाहीर सभेतूनही सांगितलाय. तर उद्धव ठाकरेंनी चंद्रकांत पाटलांचा समाचार तर घेतलाच. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही घेरलंय. एक तर चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घ्या नाही तर शिंदेंनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. तर चंद्रकांत पाटील बाळासाहेबांबद्दल नाही तर उद्धव ठाकरेंबद्दल बोलल्याचं सांगत, मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केलाय.

फडणवीस आणि उद्धव ठाकरेही याआधी आमनेसामने

बाबरी मशीद आणि शिवसेनेवरुन चंद्रकांत पाटीलच बोलले असं नाही. तर काही महिन्याआधी याच विषयावरुन फडणवीस आणि उद्धव ठाकरेही आमनेसामने आले होते. आपण स्वत: बाबरी पाडण्यासाठी गेलो होतो, तेव्हा शिवसेना कुठं होती ? असा जाहीर सवाल फडणवीसांनीही केलाय.

हे सुद्धा वाचा

आरोपींमध्ये शिवसेनेचे ठाण्याचे सतीश प्रधान यांचाही समावेश

बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणात एकूण 32 आरोपी होते. 2020मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर त्यांची आरोपातून निर्दोष मुक्तताही झाली. पण त्याचवेळी सुप्रीम कोर्टात प्रकरण असताना 17 आरोपींचं निधन झालं, ज्यात बाळासाहेब ठाकरेंचंही नाव होतं. त्यामुळं लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारतींसह 32 हयात असलेल्यांवरच खटला चालला. विशेष म्हणजे या 32 आरोपींमध्ये शिवसेनेचे ठाण्याचे सतीश प्रधान यांचाही समावेश होता.

खासदार संजय राऊत यांचीदेखील टीका

दुसरीकडे बाबरी प्रकरणावरुन बाळासाहेबांबत चंद्रकांत पाटलांच्या तोंडून भाजपच बोलत असल्याचं खासदार संजय राऊत म्हणालेत. बाळासाहेबांचा अवमान केलेला नाही, असं चंद्रकांत पाटील वारंवार सांगतायत. पण बाबरीवरुन चंद्रकांत दादा जे बोलले त्यावरुन ठाकरे गट विशेषत: उद्धव ठाकरेंनीही घेरण्याची संधी सोडलेली नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.