हिंदू आहात तर मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करा, चंद्रकांत पाटलांचं राहुल गांधींना आव्हान

आपण हिंदू असल्याचे सांगितले असले तरी हिंदू आणि हिंदुत्व असा त्यांचा संभ्रम झाला आहे. ते हिंदू असल्याचे सांगतात तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रमाणे मंदिरांची पुनर्स्थापना करत आहेत त्याप्रमाणे कार्य करावे, असे पाटील यांनी सोमवारी राहुल गांधी यांना दिले.

हिंदू आहात तर मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध करा, चंद्रकांत पाटलांचं राहुल गांधींना आव्हान
चंद्रकांत पाटील, राहुल गांधी
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 8:59 PM

मुंबई : देशात 2014 पासून हिंदुत्ववाद्यांची सत्ता आहे. हिंदूंची सत्ता नाही. त्यामुळे या हिंदुत्ववाद्यांना सत्तेतून बाहेर काढा. देशात पुन्हा हिंदुंची सत्ता आणा, असं वक्तव्य काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकतंच केलं आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधलाय. ‘आपण हिंदू असल्याचे सांगितले असले तरी हिंदू आणि हिंदुत्व असा त्यांचा संभ्रम झाला आहे. ते हिंदू असल्याचे सांगतात तर त्यांनी मोगलांनी हिंदू मंदिरांवर (Hindu Temple) केलेल्या आक्रमणाचा निषेध करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) ज्या प्रमाणे मंदिरांची पुनर्स्थापना करत आहेत त्याप्रमाणे कार्य करावे, असे पाटील यांनी सोमवारी राहुल गांधी यांना दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काशी येथील विश्वनाथ मंदिराच्या परिसरातील भव्य विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम मोठ्या स्क्रीनवर पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. पुण्यात हडपसर परिसरात मांजराई देवी मंदिराच्या आवारात या कार्यक्रमात भाग घेतल्यानंतर पाटील पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांनी आपण हिंदू आहोत पण हिंदुत्ववादी नाही, असे वक्तव्य केल्याबद्दल एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता पाटील वरील आव्हान दिले आहे.

‘हिंदू तत्त्वज्ञानाचा आग्रही असतो तो हिंदुत्ववादी’

पाटील म्हणाले की, राहुल गांधी यांचे वक्तव्य त्यांचा संभ्रम दर्शविते. हिंदू आणि हिंदुत्ववादी यात काय फरक आहे ? हिंदू धर्म म्हणजे विशिष्ट एकच पूजा पद्धती नाही, तर हिंदू हा गुणवाचक शब्द आहे. जो हिंदू तत्त्वज्ञानाचा आग्रही असतो तो हिंदुत्ववादी असतो. या देशात हिंदू समाजात वेगवेगळ्या पूजा पद्धती निर्माण झाल्या आणि मंदिरे निर्माण झाली. त्यावर मोगलांनी आक्रमण केले. राहुल गांधी स्वतःला हिंदू म्हणत असतील तर त्यांनी मोगलांनी मंदिरांवर केलेल्या आक्रमणाचा निषेध केला पाहिजे.

‘मोदी हे सच्चे भारतीय आणि सच्चे हिंदुत्ववादी’

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सच्चे भारतीय आणि सच्चे हिंदुत्ववादी आहेत. काशीला गंगेत स्नान करून विश्वनाथ मंदिरात दर्शनाला येताना प्रचंड गर्दी होत होती आणि मंदिराभोवती प्रदूषण व सांडपाणी होते. ते हटविण्याचा संकल्प त्यांनी पूर्ण केला. आता मंदिराच्या भोवती पाच लाख चौरस फुटांचा सुंदर परिसर निर्माण झाला आहे. भाविकांना मोकळेपणाने वावरण्यासाठी जागा आहे. गंगेत स्नान करून भाविक थेट मंदिरात येऊ शकतात. मोदीजींनी अयोध्येतील राम मंदिराचा विषय मार्गी लावला आहे. केदारनाथ येथे शंकराचार्याचा पुतळा उभारून समाधीचे काम केले आहे तसेच मंदिर परिसरात मोठी विकास कामे केली आहेत. ते एका पाठोपाठ एका मंदिराचे काम करत आहेत. हा त्यांचा भावनिक अजेंडा आहे’, असंही पाटील म्हणाले.

‘महाविकास आघाडी सरकार सर्वांच्या आयुष्याशी खेळत आहे’

पाटील एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले की, म्हाडाच्या भरती परीक्षेत भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली गेली. प्राथमिक अहवालानुसार म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटण्याचा संबंध थेट मंत्रालयापर्यंत आहे. महाविकास आघाडी सरकार सर्वांच्या आयुष्याशी खेळत आहे. एसटी कर्मचारी, एमपीएससीचे विद्यार्थी, आरोग्य विभाग भरती परीक्षा देणारे उमेदवार, म्हाडा भरतीसाठीचे उमेदवार, मराठा समाज, ओबीसी, अनुसूचित जाती – जमाती, शेतकरी अशा सर्वांच्या आयुष्याशी खेळ करून महाविकास आघाडी सत्तेचा उपभोग घेण्यात मग्न आहे.

इतर बातम्या :

ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका नको, नाना पटोलेंकडून भूमिका स्पष्ट, उद्याच्या सुनावणीकडे लक्ष

राज्यात ओमिक्रॉन रुग्णांच्या संख्येत भर, पुणे आणि लातूरमधील रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह!

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.