चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ वक्तव्याचं समर्थन

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं काम पाहून थक्क होऊन त्यांना 'हॅट्स ऑफ पवार साहेब' असं म्हणणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केलं आहे.

चंद्रकांत पाटलांकडून पंकजा मुंडेंच्या 'त्या' वक्तव्याचं समर्थन
Follow us
| Updated on: Oct 29, 2020 | 7:59 PM

सांगली: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं काम पाहून थक्क होऊन त्यांना ‘हॅट्स ऑफ पवार साहेब’ असं म्हणणाऱ्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी समर्थन केलं आहे. या वयातही पवार कार्यरत आहे. त्याचं कौतुकच असून पंकजा यांनी पवारांचं कौतुक करून काहीही अयोग्य केललं नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. (chandrakant patil reaction on pankaja munde statement on sharad pawar)

सांगली येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांच्या ट्विटरवरून प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी हे समर्थन केलं. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याशी सहमत असल्याचं ट्विटही त्यांनी केलं आहे. ‘शरद पवार हे या वयात प्रत्येक आपत्तीमध्ये घराबाहेर पडतात हे वैशिष्ट्य असून राज्याचे मुख्यमंत्री घरात बसून असतात. त्यामुळे शरद पवारांचे कौतुकच आहे आणि कोणी चांगलं काम करत असेल तर त्याचं कौतुक करणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. त्यामुळे शरद पवारांचे कौतुक करून पंकजा मुंडे यांनी काही अयोग्य केलं नाही,’ असं सांगून चंद्रकांत पाटील यांना पंकजा मुंडे यांची पाठराखण केली आहे.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

शरद पवार यांनी कोरोना संसर्गाच्या काळात राज्यातील अनेक शहरांना भेटी देऊन तेथील उपाय योजनांची पाहणी केली. याचाही उल्लेख करत कोरोनाच्या काळात इतका सगळा दौरा, आपली बैठक आणि आपल्या काम करण्याच्या स्टॅमिनाचे अप्रूप वाटले, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पक्ष, विचार आणि राजकारण वेगळे जरी असले तर कष्ट करणाऱ्या विषयी आदर व्यक्त करायचे मुंडे साहेबांनी शिकवले आहे, असंही पंकजा मुंडे सांगायला विसरल्या नाहीत.

ऊसतोड कामगारांच्या संपाचा तिढा सोडवण्यासाठी पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला पंकजा मुंडे उपस्थित होत्या. यावेळी पंकजा मुंडे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. तसंच बैठकीवेळी पंकजा यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. (chandrakant patil reaction on pankaja munde statement on sharad pawar)

संबंधित बातम्या:

‘पवारसाहेब हॅट्स ऑफ’, पंकजांकडून जाहीर कौतुक

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; सीमाभागातील मराठी बांधवांसाठी 1 नोव्हेंबरला काळ्या फिती लावून कामकाजाचा निर्णय

ऊसतोड मजुरांसाठी कट्टर विरोधक भावंडांमध्ये ‘गोडवा’, पंकजा-धनंजय मुंडे 1 वर्षानंतर एकत्र

(chandrakant patil reaction on pankaja munde statement on sharad pawar)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.