Modi 22 तास काम करतात 2 तास झोपतात, ते झोपावं लागू नये यासाठी प्रयोग करतायत : चंद्रकात पाटील
भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) त्यांच्या वक्तव्यामुळं अनेकदा चर्चेत असतात. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
कोल्हापूर: भाजप (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) त्यांच्या वक्तव्यामुळं अनेकदा चर्चेत असतात. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. पाटील यांच्या कोल्हापूरमधील वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी ते वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झोपेसंदर्भात केलं आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) दिवसातून 22 तास जागे असतात. ते केवळ 2 तास झोपतात. सध्या नरेंद्र मोदी एक प्रयोग करत असून तो म्हणजे त्यांना झोपावं लागणार नाही, असा असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं. काँग्रेसचे आमदार चंद्रकात जाधव यांच्या निधनामुळं कोल्हापूर उत्तर जागा रिक्त झाली आहे. त्या जागेची पोटनिवडणूक लागली असून भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. यानिमित्त कार्यकर्ता मेळाव्यात चंद्रकातं पाटील बोलत होते.
चंद्रकांत पाटील काय म्हणाले?
आपल्याला आगामी काळात एकनं एक निवडणूक जिंकावी लागणार आहे. 2024 ला आपल्याला 400 पेक्षा जास्त जिंकायच्या आहेत. काही गोष्टी करण्यासाठी तीन चर्तुर्थांश बहुमत आवश्यक आहे. चार राज्यांच्या निवडणुकांमध्ये आपण कमी पडलो असतो तर राष्ट्रपती निवडणूक आपण गमावली असती. एक मोदी तयार होण्यासाठी अनेकजण मेहनत करत असतात. मोदी यांनी त्यांच्यावर होणारी मेहनत वाया जाऊ दिली नाही. ते 22 तास काम करतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नरेंद्र मोदी एक प्रयोग करतात त्यामध्ये त्यांना झोपावं लागणार नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. नरेंद्र मोदी सकाळी 6 वाजता फोन करतात त्यामुळं मंत्री पाहाटे 5.30 वाजल्यापासून सतर्क असतात. आता त्यांना रात्रभर सतर्क राहावं लागेल, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
पाहा व्हिडीओ:
“Prime Minister Narendra Modi sleeps only 2 hours a day, whereas works for 22 hours
PM is doing an experiment so that he does not need to sleep and he can work 24 hours for the country”.
Maharashtra BJP President #Chandrakant_Patil
I am speechless.
— Kishor Kumar Jain (@k08686055_jain) March 21, 2022
चंद्रकांत पाटील यांचा जुना व्हिडीओ देखील व्हायरल
चंद्रकांत पाटील यांचा जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. आज चॅलेंज आहे आपलं, ज्यांना वाटतं त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कोणत्याही विधानसभेचा राजीनामा द्यावा, निवडून नाही आलो तर डायरेक्ट हिमालयात निघून जाईन, असं चंद्रकात पाटील म्हणाले होते.
भाजपकडून सत्यजीत कदम यांना उमेदवारी
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपनं सत्यजीत कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, काँग्रेसनं चंद्रकात जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना उमेदवारी दिली आहे.
इतर बातम्या :
‘बाळासाहेब सोनियांची लाचारी करणाऱ्यांना XXX म्हणत’, अनिल बोंडेंची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका