Chhagan Bhujbal : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या फैसला; छगन भुजबळ म्हणतात, दोघांनाही वाटतं आमच्याच बाजूने निकाल लागेल

Chhagan Bhujbal : शिवभोजन केंद्रांचे पैसे अडकले आहेत याबाबत उद्या मी हाऊसमध्ये बोलेल. सरकारला सांगेल की ही गरीब मंडळी असून त्यांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर ते केंद्र बंद पडतील. चांगली योजना असून सरकारने ती सुरू ठेवावी.

Chhagan Bhujbal : राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या फैसला; छगन भुजबळ म्हणतात, दोघांनाही वाटतं आमच्याच बाजूने निकाल लागेल
राज्यातील सत्तासंघर्षावर उद्या फैसला; छगन भुजबळ म्हणतात, दोघांनाही वाटतं आमच्याच बाजूने निकाल लागेलImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 1:12 PM

नाशिक: राज्यातील सत्ता संघर्षावर उद्या फैसला होणार आहे. त्यामुळे या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शिवसेना (shivsena) नेमकी कुणाची? धनुष्यबाण कुणाचा? आणि अपात्र आमदारांचं काय होणार? याचा उद्या फैसला होणार आहे. तसेच राज्यातील शिंदे सरकारचंही या निमित्ताने उद्याच भवितव्य ठरणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी भाष्य केलं. आमच्याच बाजूने निकाल लागेल असं दोन्ही पक्षांना असं वाटतंय. आपण वेट अँड वॉचवर आहोत. उद्या निर्णय लागतो की आणखी काही घटनात्मक बेंच बसते हे पाहावं लागणार आहे. मागेच वाटले होते की निर्णय लागेल पण तारीख पुढे गेली. घटनापीठ तयार करावे लागेल असे सुद्धा कोर्टाने (supreme court) म्हटले होते, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं. सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा हे राज्यातील सत्ता संघर्षावर निकाल देणार आहेत.

छगन भुजबळ यांनी यावेळी आशिष शेलार यांच्या आरोपांचाही समाचार घेतला. कोरोना असल्याने सगळेच, तुम्ही सुद्धा घरी बसले होते. मोदी साहेबांनीच लॉकडाऊन सांगितल्याने आपण धार्मिक सण कसे साजरे करणार होतो? कोरोना कमी झाल्याने आता धार्मिक स्थळांवर, सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होते आहे. गणेशोत्सव, नवरात्रात सुद्धा गर्दी होणार असल्याने हे श्रेय भाजपने घेता कामा नये. दोन वर्षांचीच आता भरपाई होते आहे, असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

टिपू सुलतानचा इतिहास आहेच, पण

यावेळी त्यांनी एमआयएमचे नेते ओवैसी यांनाही सबुरीचा सल्ला दिला. ओवैसी यांनी द्वेष निर्माण करू नये. टिपू सुलतान लढले तो इतिहास आहेच. पण सावरकरांनी सुद्धा काळ्या पाण्याची शिक्षा सुद्धा भोगली त्यामुळे त्यांचे महत्व कमी होत नाही, असं त्यांनी सांगितलं.

सर्वांनाच वाटतं आमचाच महापौर व्हावा

मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसेल असं काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावरही त्यांनी कोटी केली. सर्वच पक्ष म्हणताय आमचा महापौर बसणार. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी असे म्हणावे लागते, असा चिमटा त्यांनी फडणवीसांना काढला.

पालकमंत्री नाही, कुणाकडं बोलावं तेच कळना

यावेळी त्यांनी शिवभोजन योजनेवरही भाष्य केलं. शिवभोजन केंद्रांचे पैसे अडकले आहेत याबाबत उद्या मी हाऊसमध्ये बोलेल. सरकारला सांगेल की ही गरीब मंडळी असून त्यांना वेळेवर पैसे मिळाले नाहीत तर ते केंद्र बंद पडतील. चांगली योजना असून सरकारने ती सुरू ठेवावी. सत्तांतर झाले पण मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. पालकामंत्री नाहीये आणि आता अधिवेशन सुरू झाले त्यामुळे कोणाकडे याबाबत बोलायचे हेच कळत नाहीये, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.