राज्यपाल चांगली व्यक्ती, ‘त्या’ नावांना विरोध करणार नाहीत; भुजबळांचा टोला
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे चांगले व्यक्ती आहेत. ते राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नावाला विरोध करणार नाहीत, असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे.
नाशिक: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari ) ही चांगली व्यक्ती आहे. ते राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांच्या नावाला विरोध करणार नाहीत, असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal ) यांनी लगावला आहे. (chhagan bhujbal taunt governor)
‘टीव्ही9 मराठी’शी संवाद साधताना छगन भुजबळ यांनी हा टोला लगावला. राज्यपालांकडे काही सदस्यांची नावे पाठवण्यात आली आहेत. राज्यपाल हे चांगले व्यक्ती आहेत. त्यामुळे ते या नावांना विरोध करतील असं वाटत नाही, असं सांगतानाच काही पक्षांची नावेही मुख्यमंत्र्यांकडे आल्याचा गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला.
राज्यात दिवाळीत फटाके न वाजवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यावरही भुजबळ यांनी भाष्य केलं. राज्यात फटाक्यांवर बंदी नाही. मात्र फटाके न वाजवण्याचं आवाहन करण्यता आलं आहे. फटाक्यांचा धूर कोरोनाग्रस्तांसाठी हानीकारक ठरू शकतो. त्यामुळे हे आवाहन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कालच राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही यंदाची दिवाळी फटाकेमुक्त साजरी करण्याचं आवाहन केलं होतं. राज्यात थंडी पडली असून वातावरण बदललं आहे. त्यामुळे कोरोनाचा कोणताही धोका उद्भवू नये म्हणून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन त्यांनी केलं होतं.
नागपूरमध्ये अधिवेशन नाही?
यंदा नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होणार नसल्याच्या चर्चा आहेत. त्यावरही त्यांनी मत व्यक्त केलं. नागपूरच्या आमदार निवासात कोव्हिड सेंटर उभारण्यात आलेलं आहे. त्यामुळे नागपूरच्याच आमदारांनी नागपूरमध्ये अधिवेशन घेऊ नये अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र अधिवेशन कुठे घ्यायचं हे बिझनेस अॅडव्हाझरी कमिटी निर्णय घेईल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी दिवाळीत काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही दिला. (chhagan bhujbal taunt governor)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार? चर्चेअंती निर्णयाची शक्यता https://t.co/Gmxa4OcyGT @OfficeofUT @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @NANA_PATOLE #CoronaVirusUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2020
संबंधित बातम्या:
Nashik | छगन भुजबळ आणि राज्यपाल यांची सभागृहात जुगलबंदी रंगली
रोहित पवारांना ‘अव्वल’ आणण्यासाठी मातोश्रींनी कंबर कसली, सुनंदा पवार कर्जत-जामखेडच्या मैदानात
(chhagan bhujbal taunt governor)