Chhattisgarh Election Exit Poll Result | भाजपचं छत्तीसगडमधलं स्वप्न भंगलं, पुन्हा काँग्रेसची बाजी, एक्झिट पोलच्या आकडेवारीचा दावा
Chhattisgarh Election Exit Poll Result 2023 | छत्तीसगडमध्ये भाजपने प्रचंड कंबर कसली आहे. भाजपला तिथे सत्तापालट घडवून आणायचा आहे. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, भाजपला छत्तीसगडमध्ये सत्तापालट करुन दाखवण्यात यश येण्याची शक्यता कमी आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, काँग्रेस पुन्हा एकदा तिथे सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे.
रायपूर | 30 नोव्हेंबर 2023 : छत्तीसगड विधानसभेच्या एकूण 90 जागांसाठी नुकतंच मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीला दोन टप्प्यात मतदान पार पडलं आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान हे 7 नोव्हेंबरला 20 जागांसाठी पार पडलं. तर उर्वरित 70 जागांसाठी 17 नोव्हेंबरला मतदान पार पडलं. छत्तीसगडसह तेलंगणा, मिझोराम, राजस्थान आणि मध्य प्रदेशात मतदान पार पडलं आहे. तेलंगणात आज दिवसभर मतदानाचा कार्यक्रम पार पडला आहे. त्यानंतर आता या पाचही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल हा येत्या 3 डिसेंबरला लागणार आहे. पण या निकालाच्या आधी आता विविध संस्थांच्या एक्झिट पोलच्या सर्वेक्षणाची आकडेवारी समोर आली आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर त्यापाठोपाठ भाजप हा दोन नंबरचा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार छत्तीसगडचा गड राखण्यात काँग्रेसला यश मिळणार आहे. तर भाजपला सत्ता स्थापन करणं कठीण होणार आहे.
छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. काँग्रेसने विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवली होती. त्यांना भाजपचं कडवं आव्हान होतं. भाजपकडून विद्यमान विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचं नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीसाठी जाहीर करण्यात आलं होतं. भाजपकडून छत्तीसगडमध्ये प्रचंड ताकद लावलण्याचे प्रयत्न केले गेले होते. पण छत्तीसगडमध्ये सत्ता स्थापन करणं भाजपला शक्य होण्याची शक्यता फार कमी असल्याचं एक्झिट पोलची आकडेवारी सूचवत आहे.
एक्झिट पोलचा अंदाज नेमका काय?
- ‘इंडिया टीव्ही’च्या आकेडीवारीनुसार काँग्रेसला 90 पैकी 46 ते 56 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 30 ते 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतर पक्षांना 3 ते 5 जागा मिळण्याची शक्यता आहे.
- ‘आजतक’च्या सर्व्हेनुसार, छत्तीसगमध्ये काँग्रेसला 40 ते 50 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 36 ते 46 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर इतर पक्षांना 1 ते 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
- पॉलस्ट्रेटच्या पोलनुसार, छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. पोलस्टार्टच्या अंदाजानुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेसच्या 40 ते 45 जागांवर यश मिळू शकतं. तर भाजपला 30 ते 35 जागांवर यश मिळू शकतं. तर इतर पक्षांना 0 ते 3 जागांवर यश मिळू शकतं.
छत्तीसगड विधानसभा निवडणूक निकाल 2023 : एक्झिट पोलचे अंदाज काय?
1) ‘इंडिया टीव्ही’ची आकडेवारी काय सांगते?
काँग्रेस – 46 ते 56 जागा भाजप – 30 ते 40 जागा इतर – 3 ते 5 जागा
2) इंडिया टुडे (आजतक) आकडेवारी काय सांगते?
काँग्रेस – 40 ते 50 जागा भाजप – 36 ते 46 जागा इतर – 1 ते 5
3) पॉलस्ट्रेटची आकडेवारी काय सांगते?
काँग्रेस – 40 ते 45 जागा भाजप – 30 ते 35 जागा इतर – 0 ते 3 जागा
4) एबीपी सीवोटर (Cvoter)
काँग्रेस – 41 ते 53 जागा भाजप – 36 ते 48 जागा इतर – 0 ते 4 जागा