ते विधान भोवलं… मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांना ताबडतोब मुंबईला बोलावलं?

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत सध्या भलतेच चर्चेत आहेत. त्यांच्या दोन विधानांमुळे ते चर्चेत आले आहेत. सावंत यांनी एक विधान शेतकऱ्यांच्या विरोधात केलंय. तर दुसरं विधान थेट मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या विरोधात केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.

ते विधान भोवलं... मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांना ताबडतोब मुंबईला बोलावलं?
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 31, 2024 | 6:06 PM

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना राष्ट्रवादीच्या विरोधात विधान करणं चांगलंच भोवलं आहे. तानाजी सावंत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीतून कडक शब्दात प्रतिक्रिया उमटली होती. या प्रतिक्रियेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी थेट तानाजी सावंत यांना मुंबईला भेटीसाठी बोलावलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच सावंत हे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचंही सांगण्यात आलं आहे.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादीच्या बाजूला बसल्यावल उल्टी आल्यासारखं होतंय, असं विधान केलं होतं. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. महाविकास आघाडीतील महत्त्वाच्या नेत्याने आणि सरकारमधील मंत्र्याने हे विधान केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. तानाजी सावंत यांच्या या विधानावर राष्ट्रवादीतून तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. त्याचीच दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे यांनी सावंत यांना भेटायला बोलावलं असल्याचं समजतं. या भेटीत शिंदे यांच्याकडून सावंत यांना समज दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे.

भाषणाची क्लिप परत ऐका

दरम्यान, तानाजी सावंत यांनी मीडियाशी संवाद साधताना त्या विधानावरून मीडियावरच खापर फोडलं. तुमच्या मीडियाने नेरेटिव्ह सेट केला आहे. तो चुकीचा आहे. त्या भाषणाची क्लिप परत ऐका. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसताना उलटी होते हा विषय आहे. काँग्रेस राष्ट्रवादी सरकार 2022च्या अगोदर होतं. तुम्ही जे तोडमोड करून दाखवताना, जरा सदसदविवेकबुद्धीला जागून बातम्या द्यायला शिका. एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे, असं तानाजी सावंत म्हणाले.

सावंत भडकले

यावेळी सावंत अत्यंत संतापलेले होते. तावातावाने बोलत होते. माझ्या विधानाचा विपर्यास केल्याचा दावा सावंत करत होते. तसेच या सर्व प्रकाराला ते मीडियालाच जबाबदार धरताना दिसत होते. यावरून सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावलं असावं असा कयास वर्तवला जात आहे.

आव्हाडांचा चिमटा

दरम्यान, शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या वादात उडी घेतली आहे. तानाजी सावंत यांना 3 लाखाची गाडी 30 लाखाला पास करून घ्यायची होती. त्या फाईलवर अजित पवार यांनी सही करण्यास नकार दिला. म्हणूनच सावंत यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात विधान केल्याचा चिमटा जितेंद्र आव्हाड यांनी काढला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.