Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पारनेरच्या तहसीलदाराचा ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा, चित्रा वाघ यांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल

'सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं', अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

पारनेरच्या तहसीलदाराचा ऑडिओ क्लिपद्वारे आत्महत्येचा इशारा, चित्रा वाघ यांचा निलेश लंकेंवर हल्लाबोल
Chitra-Wagh
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 3:53 PM

पारनेर : अहमदनगरला पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांनी ऑडिओ क्लिप तयार करून आत्महत्येचा इशारा दिला आहे. या क्लिपमुळे पारनेरसह जिल्ह्यात खळबळ उडाली. यापूर्वी वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचा संदर्भ देत देवरे यांनी ऑडिओ क्लिप जारी केलीय. त्यानंतर आता भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडिओ क्लिप ऐकली आणि मन सुन्न झालं, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय. (Chitra Wagh criticizes MahaVikas Aghadi government)

‘सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं’, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलंय की मी ही तुझ्याकडे लवकरच येतेय. त्यात त्यांनी प्रशासनाकडून कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसे त्रास देतात, वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचं दाहक वास्तव त्यांनी उभं केलंय. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही दिसत आहेत आणि हिच माझी सुसाईड नोट समजा असंही त्यांनी त्या पत्रात म्हटलंय. खरं तर सुसाईड नोटमध्ये सगळ्यांची नावं लिहून ठेवायची आणि कोर्टात ती खोटी ठरली तर? हिरा बनसोडेसारखं फिर्याद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय.

चित्रा वाघ यांच्या संतप्त सवाल

लसीकरण केंद्रात एका आरोग्य कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधीकडून मारहाण होते. कारण फक्त एकच की तिथं दुकानदारांचं लसीकरण केलं. तिथे रात्रीच लोकप्रतिनिधी जातात. महिला आरोग्य कर्मचाऱ्याला खोदून-खोदून विचारतात. तिल्या लिपिकाला मारतात. थोड्यावेळाने लिपिकाचा व्हिडीओ येतो की मला काही लोकप्रतिनिधींनी मारलं नाही. महिला अधिकाऱ्यांना किंवा महिलांना कुणी वालीच राहिला नाही. त्यामुळे प्रत्येकीने सुसाईड नोट ही ड्रॉवरमध्ये ठेवा, असंही सांगायला त्या विसरलेल्या नाहीत. हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होत आहे. माँसाहेब जिजाऊंच्या महाराष्ट्रात होत आहे आणि आम्ही सावित्रीच्या लेकी, आमच्यासोबत हे सगळं होतंय. सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे. देवमाणूस म्हणून वापरणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात हेच आता पाहायचं आहे. नाहीतरी या महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय, तिने आत्महत्या केल्याशिवाय, तिने जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे? असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन उपस्थित केलाय.

ऑडिओ क्लिप नेमकी काय?

इतर बातम्या : 

आमदारासह वरिष्ठ अधिकाऱ्यांवर आरोप करत आत्महत्येचा इशारा, अहमदनगरच्या तहसिलदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

‘त्यांना सांगितलं होतं जाऊ नका, तरीही ते गेले’, सोमय्यांच्या दगडफेकीवर खासदार भावना गवळींची पहिली प्रतिक्रिया

Chitra Wagh criticizes MahaVikas Aghadi government

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.