AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे उद्या समोरासमोर येणार नाही; वाद टाळण्यासाठी घेतला ‘हा’ निर्णय

शिवाजी पार्क परिसरात एक दिवस आधीच शिंदे गटाने भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यानिमित्ताने शिवाजी पार्क परिसरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतचे भव्य बॅनर्स लावण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे उद्या समोरासमोर येणार नाही; वाद टाळण्यासाठी घेतला 'हा' निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समोरासमोर येणार नाहीImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Nov 16, 2022 | 9:19 AM
Share

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन आहे. त्यामुळे राज्यातील कानाकोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते दादरच्या शिवाजी पार्कवरील बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर येण्याची शक्यता आहे. यावेळी दरवर्षी प्रमाणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कुटुंबासह स्मृती स्थळावर असणार आहेत. अनेक आमदारही उद्या बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्कावर येतील. उद्धव ठाकरे उद्या स्मृतीस्थळावर असणार आहेत. त्यामुळे समोरासमोरची भेट आणि कार्यकर्त्यांमधील वाद टाळण्यासाठी एकनाथ शिंदे हा आजच स्मृती स्थळावर जाणार आहेत.

शिंदे गटातील आमदार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करणार आहेत. उद्या 17 तारखेला बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी होऊ शकणारा वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच बाळासाहेबांच्या स्मृती स्थळाला अभिवादन करणार आहेत.

17 नोव्हेंबरला होणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिंदे गटाकडून ‘वारसा विचारांचा’ परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. दादरच्या सावरकर स्मारकात या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिसंवादाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवाद साधणार आहेत.

शिवाजी पार्क परिसरात एक दिवस आधीच शिंदे गटाने भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. त्यानिमित्ताने शिवाजी पार्क परिसरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्वागतचे भव्य बॅनर्स लावण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत रोजगार निर्मिती कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमातून तरुणांना मोबाईल व्हॅन आणि ट्रकच वाटप मुख्यमंत्र्याच्या हस्ते केलं जाणार आहे. बाळासाहेबांच्या स्मृतीदिना आधीच शिंदे गटाकडून भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्यांचे आजचे कार्यक्रम

दुपारी 1.45 वा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या ‘राजगृह’ निवासस्थानाला भेट स्थळ – दादर (पूर्व), मुंबई.

दुपारी 3.00 वा. युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विविध उद्योजकांशी सामंजस्य करार करण्याबाबत रोजगार मेळावा स्थळ – राजभवन, मलबार हिल, मुंबई.

सायं. 04.00 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाचा आढावा स्थळ – इंदू मिल, दादर, मुंबई,

सायं. 05.00 वा.स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या कामाचा आढावा. स्थळ – महापौर बंगला, शिवाजी पार्क, दादर, मुंबई.

सायं. 05.30 वा. परिसंवाद आणि मुख्यमंत्री रोजगार योजनेंतर्गत वाहन वाटप कार्यक्रम स्थळ – सावरकर स्मारक, दादर, मुंबई.

सायं. 07.00 वा. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन स्थळ – स्मृतीस्थळ, शिवाजी पार्क, दादर, मुंबई,

नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.