Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आम्ही चिखल तुडवला, इर्शाळवाडीत काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला

इर्शाळवाडीतील लोकांची आम्ही कंटेनरमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या संडास, बाथरूमची व्यवस्था केली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही भूखंड पाहिला.

आम्ही चिखल तुडवला, इर्शाळवाडीत काही लोक व्हॅनिटी व्हॅनने आले; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरे यांना टोला
cm eknath shindeImage Credit source: vidhan sabha live
Follow us
| Updated on: Jul 28, 2023 | 1:34 PM

मुंबई | 28 जुलै 2023 : राज्यातील पूरस्थितीवर आज विधानसभेत चर्चा झाली. शेतकऱ्यांना आणि नैसर्गिक आपत्तीत नुकसान ओढवलेल्यांना तात्काळ मदत करण्याची मागणी विरोधकांनी केली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत तुफान फटकेबाजी केली. पूरस्थितीवर बोलता बोलता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडी दरड दुर्घटनेला हात घातला. यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. आम्ही चिखल तुडवत इर्शाळवाडीत गेलो. तर काही लोक तिकडे व्हॅनिटी व्हॅन घेऊन आले होते, अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

इर्शाळवाडीची दुर्घटना झाली. सरकार त्यांच्या पाठी राहिलं. ज्या ज्या ठिकाणी पूर आला, अतिवृष्टी झाली त्यांच्या पाठी सरकार राहिलं आहे. सरकार सर्वांच्या पाठी राहत असतं. माझं कुटुंब आणि माझी जबाबदारी एवढ्या पुरतं हे सरकार मर्यादित नाही. हे सरकार सामान्य जनतेचं सरकार आहे. म्हणून आम्ही तातडीने नुकसानग्रस्तांना पैसे दिले. त्यांना तिष्ठत ठेवले नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

केवळ देखावा नाही

शेतकरी जेव्हा अडचणीत येतो, सामान्य माणूस अडचणीत येतो, तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठी आपण उभे राहतो. आपण दुर्घटनास्थळी गेल्यावर लोक खडबडून जागी होतात. मीही तिथे गेलो. फार कठिण परिस्थिती होती. पण काही लोक व्हॅनिटी व्हॅनमधून आले होते. माझ्यासह काही लोक चिखल तुडवत गेले. मी गेलो म्हणून मोठेपणा सांगत नाही. या दुर्घटनेच्या दिवशी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मी संपर्कात होतो. कंट्रोल रुमशी संपर्कात होतो. मोठी यंत्रणा तिकडे होती. त्यामुळे मदत झाली. आम्ही केवळ देखावा केला नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

वर्क फ्रॉम होम नाहीये

इर्शाळवाडीतील लोकांची आम्ही कंटेनरमध्ये राहण्याची व्यवस्था केली. त्यांच्या संडास, बाथरूमची व्यवस्था केली. आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही. या लोकांचं पुनर्वसन करण्यासाठी आम्ही भूखंड पाहिला. या भूखंडावर सिडकोला तातडीने घरे बांधून देण्यास सांगितले. आम्ही बोलून थांबत नाही. आम्ही रस्त्यावर उतरून काम करणारे लोक आहोत. वर्क फ्रॉम होम नाहीये हे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांना नाव न घेता लगावला.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल
नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल.
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान
ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान.
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती
सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती.
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका.
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'
आधी शिंदे-दादांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली अन् आता म्हणताय, 'मी तर..'.
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'
चंद्रकांतदादांच्या ऑफरवर विशाल पाटील म्हणाले, 'विचार वेगळे असले तरी..'.
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप
प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न सुरू; धनंजय देशमुखांचा आरोप.
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र
राणेंवर कारवाई करा, ठाकरेंचा नेता भडकला, 'त्या' वक्तव्यावरुन CMला पत्र.
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात
औरंगजेब आव्हाडांचा दैवत? जितूमियाँ म्हणत शिवसेनेच्या खासदाराचा घणाघात.
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला
औरंगजेबाच्या कबरी जवळ बंदोबस्त वाढवला.