उद्धव- मोदी भेट, चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकणारच : राष्ट्रवादी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. या भेटीत मराठा आरक्षण या महत्त्वाच्या विषयासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.

उद्धव- मोदी भेट, चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकणारच : राष्ट्रवादी
Devendra Fadnavis_Chandrakant Patil
Follow us
| Updated on: Jun 08, 2021 | 11:09 AM

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची भेट घेत आहेत. या भेटीत मराठा आरक्षण (Maratha reservation) या महत्त्वाच्या विषयासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा मोदींना भेटणार आहेत. या भेटीकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहेच, शिवाय महाराष्ट्रातील राजकीय पक्षही या भेटीकडे लक्ष ठेवून आहेत. (CM Uddhav Thackeray meeting with PM Narendra Modi, NCP targets Devendra Fadnavis and Chandrakant Patil Amol Mitkari)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी, ठाकरे-मोदी भेटीवरुन भाजपवर निशाणा साधला. अमोल मिटकरींनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. “चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा जीव निश्चितच आज टांगणीला लागला असेल. आम्हाला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री महाराष्ट्राच्या अडचणी समजून घेतील. मात्र कमालीची अस्वस्थ झालेली ही जोडी सकारात्मक चर्चेनंतरही सारीपाठाचा ‘शकुनी’ डाव टाकल्याशिवाय राहणार नाही”, असं ट्विट अमोल मिटकरी यांनी केलं आहे.

अमोल मिटकरी यांचं ट्विट 

याशिवाय अमोल मिटकरींनी दुसरं ट्विट करुन, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यावरही घणाघात केला. “अजून बैठकीला सुरुवात पण झाली नाही आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर महाराष्ट्र महाविकास आघाडी सरकारवर बोलायला लागले.अर्थ स्पष्ट आहे भाजपा मानसिक दृष्ट्या थकलेला पक्ष झाला आहे. बडबड आणि वायफळ विधाने यापेक्षा दुसर त्यांच्याकडे काही शिल्लक नाही”, असं मिटकरी म्हणाले.

संबंधित बातम्या   

ठाकरे-मोदी भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल; संजय राऊतांना विश्वास

Udhav Thackeray PM Modi Meet Live | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा ताफा पंतप्रधानांच्या निवासस्थानी दाखल 

(CM Uddhav Thackeray meeting with PM Narendra Modi, NCP targets Devendra Fadnavis and Chandrakant Patil Amol Mitkari)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.