शिवसेनेचा 56 वा वर्धापनदिन, उद्धव ठाकरेंचं जोरदार भाषण, भाषणातील 5 महत्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर…

आज शिवसेनेता 56 वा वर्धापनदिन आहे. त्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं. विविध मुद्द्यांना त्यांवनी स्पर्श केला. या भाषणातील 5 महत्वाचे मुद्दे कोणते होते. पाहूयात विस्ताराने...

शिवसेनेचा 56 वा वर्धापनदिन, उद्धव ठाकरेंचं जोरदार भाषण, भाषणातील 5 महत्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 3:12 PM

मुंबई : आज शिवसेनेता 56 वा वर्धापनदिन (ShivSena 56th Anniversary) आहे. त्यानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार भाषण केलं. विविध मुद्द्यांना त्यांवनी स्पर्श केला. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून ते सध्याची शिवसेना यावर भाष्य केलं. शिवाय शिवसैनिक हीच शिवसेनेची ताकद आहे, असं सांगायलाही ते विसरले नाहीत. शिवाय विरोधकांवरही त्यांनी टीकेचे बाण सोडले. अग्निपथ या केंद्र सरकारच्या नव्या योजनेवरही त्यांनी भाष्य केलं. या भाषणातील 5 महत्वाचे मुद्दे कोणते होते? पाहूयात विस्ताराने…

शिवसेनेची 56 वर्षे

“उभं राहून बोलू शकतो याअगोदर दाखवलंय, शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. माझ्या फादरनेच या पक्षाला जन्म दिला. पितृपक्षाबद्दल अनेक गैर समज माझा पक्ष पितृपक्षच. 56 वर्षातल्या अनेक गोष्टी ताज्या. जेव्हा शपथ घेतली तेव्हा शिवाजी पार्कच्या घरात आजोबा, साहेब, काका, माँ वेळ काळ न बघता शिवसेनेची स्थापना. त्या क्षणाचे साक्षीदार माझे वय सहा वर्ष. शिवाजी महाराज की जय म्हणून नारळ फोडला त्याचे पाणी माझ्या अंगावर. फार मोठी जबाबदारी किती मोठी असेल हे तेव्हा काहीच कळले नाही. तुमच्या साथीने आपण अजून पुढे जाऊ. काहि आहेत काही निघून गेलेत त्या सर्वांना अभिवादन. त्या पिढीचे देसाई रावतॆ पहिल्या पिढीचे. शिवसेनेचा पहिला महापौर 1971 साली हेच खूप होत. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत. तुमची जबाबदारी माझी. दोघांनीही एउसवे फुगवे न करता ऐकले. दोघांत आजही शिवसैनिक जिवंत आहे. त्यांना जी जबाबदारी दिली ती यशस्वी करुन दाखवली. मार्मिक छापायला तयार नसतांना दिवाकर रावतेंनी ते शक्य केले”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“सुभाष देसाईंचे नाव सुचवले आणि तेव्हापासून देसाई साहेब सामनाला जोडले गेले. वयाने मोठे आहेत पण माझा आदेश समजून काम करताहेत. शिवसेनेसाठी दोघेही हवे आहेत. नव्या दमाचे रोज सैनिक येताहेत. उद्या निवडणूक. एक लोकशाही प्रमाणे बडदास्त ठेवली आहे. यांना एकत्र ठेवणे ही आजची लोकशाही. वर्धापन दिन म्हटल्यावर शिवसैनिक पण आहेत. इतके आमदार दिसायला हवे. रमेश गेला कट्टर कार्यकर्ता. अस म्हटलं जात पायलट त्याचे ट्रेनिंग तसा एखादा कार्यकत्रता गेला तर तो मोठा फटका असतो”, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विधान परिषद निवडणूक जिंकणारच!

“आमदार, मुख्यमंत्री, खासदार उद्याच्या निवडणुकीत अजून वाढतील. सगळ आता काही बोलणार नाही. तुमच्या समवेत हा दिवस साजरा करायचा होता. पावसात भिजण्या पेक्षा विचाराने भिजू. मी उद्याची निवडणूक जिंकणारच राज्यसभा निवडणुकीत झाल ते होणार नाही. एकही मत फुटलेले नाही. कुणाचा मत फुटल ते सगळ आलय समोर. कितीही फाटल तरी शिवसेनेने इतिहासाला दाखवलेले आहे. शिवसेनाप्रमुख म्हणाले होये आईचे दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको. अनेकांनी शिवसेना मोठी केली पण भोगले नाही आपल्याला मिळतय. नुसत्या उध्दव ठाकरेला किंमत नाही बाळासाहेब नाव आहे म्हणून तुमचे प्रेम. माझ्यावर जबाबदारी कशी कुणी दिली या घरात जन्म होणे हे अनाकलनीय. आव्हान येतात आणि जातात. आणीबाणी आली तेव्हा शिवसेनेवर संकट पण तेव्हा धाडस दाखवले हा आपला स्थायीभाव. गेल्या 56 वर्षांचा अनुभव. आता आपण मजबूत. आपला जन्म भूमिपुत्रासाठी. ज्या वेळेला कुणी हिंदुत्वार बोलणारे कुणी नव्हत तेव्हा शिवसेनेने ते बुलंद केले. मला राज्य पाहिजे पण कारभार जमणार नसेल तर तुम्ही नालायक”, असं म्हणत त्यांनी मविआ विधान परिषद निवडणूक जिंकणार असल्याचा विश्वास बोलून दाखवला.

केंद्राच्या ‘अग्निपथ’वर भाष्य

“अग्निपथ मुळे तरुण रस्त्यावर. ह्दयात राम आणि हाताला काम तेच चित्र आज देशात. काम नसेल तर काही उपयोग नाही. वारकरी आपलेच. नोटाबंदी झाली तेव्हा कुणी बोलले नाही, शेतकऱ्यांनी कायद्यावर हटून बसला मग एक पाऊल मागे घ्यावे लागले. आपण का टिकलो कारण आपण जे वचन दिले ते पाळले. अचानक योजना आणायची अग्नीवीर नाव द्यायच पण शिकवणार काय? चार वर्षाने यांच्या नौकरीचा पत्ता नाही”, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी केंद्राच्या अग्निपथ योजनेवर भाष्य केलं.

महाराष्ट्रा समोर सत्तेचा माज चालणार नाही!

“शिवाजीराव देशमुखांच्या भाषणात शिवाजी महाराज, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी 16 व्या वर्षी. पण आता उमेदीच्या वयात त्याला काहीतरी दाखवणार नंतर फक्त १०% लोकांना घेणार. भाडोत्री सैन्य मग काढा टेंडर. तुम्ही मग सगळच वापरा आणि फेका. मग ही लोक भडकणार नाही तर काय. तुम्हाला मत दिल ते नुसत मत नाही एक धोरण असायला हवे. उद्याची निवडणूकीत आमच्यात फुट पडू शकत नाही हे उद्या देशाला दाखवायचे आहे. महाराष्ट्रात तुमचा सत्तेचा माज चालणार नाही. प्रत्येकाला पर्याय असतोच, शेराला सव्वा शेर येणार आताचे राजकारण पाव शेराचे”, असा इशाराच त्यांनी केंद्राला दिलाय.

विधान परिषदेची मोर्चे बांधणी

“महाराष्ट्र पेटत नाही जेव्हा पेटतो तेव्हा समोरच्याला जाळून टाकतो. हिंदुस्थानावरचा हिरवा वरवंटा महाराजांनी काढला. सचिन अहिर चांगल काम करतोय. आमशा 1300 मतांनी पडले. आदिवासी हक्काचा माणूस. संपर्क प्रमुख म्हणून अहिरांचे काम चांगले. हे आपलेच आहेत. शिवसेनेच्या बांधणी साठी नविन रक्त. देसाई रावतेंनी सांगितले तुम्ही निर्णय घेतला ते मान्य आम्ही शिवसैनिक. म्हणूनच आपण 56 वर्षे टिकलो. शिवसेना अजून नुसते 56 नाही तर अजून खूप पुढे जाणार आहे. अशी प्रार्थना करतो”, असं म्हणत त्यांनी भाषणाचा समारोप केला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.