संजय राऊतांच्या ‘त्या’ विधानावर महाविकास आघाडीत खटके?; शरद पवारांनंतर वडेट्टीवार काय म्हणाले?

बारामतीत भावी मुख्यमंत्री म्हणून सुप्रिया सुळे यांचे बॅनर्स लागले आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सर्वच पक्ष आपआपले बॅनर्स लावतात. पण महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे. शंभर टक्के मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार. महाविकास आघाडीची सत्ता येईल. सत्ता आल्यावर महाविकास आघाडीचे नेते मुख्यमंत्री ठरवतील, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

संजय राऊतांच्या 'त्या' विधानावर महाविकास आघाडीत खटके?; शरद पवारांनंतर वडेट्टीवार काय म्हणाले?
vijay wadettiwarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 1:46 PM

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी श्रीगोंदा विधानसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. त्यावरून महाविकास आघाडीत खटके उडाले आहेत. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी जागा वाटप झालेलं नाही. कुणीही उमेदवार जाहीर करू शकत नाही, असं स्पष्टपणे म्हटलं आहे. पवार यांनी एक प्रकारे संजय राऊत यांनाच फटकारलं आहे. आता विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही संजय राऊत यांच्या विधानाशी असहमीत दर्शवली आहे. तर शरद पवार यांचं म्हणणंच योग्य असल्याचा दावा केला आहे.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. कुठलाही निर्णय न होता उमेदवार जाहीर करणे चुकीचं आहे. पवार साहेब म्हणतात ते बरोबर आहे. कारण जेव्हा तिन्ही पक्षाचा निर्णय होईल तेव्हाच उमेदवार जाहीर केले पाहिजे, असं विजय वडेट्टीवार यांनी थेट स्पष्ट केलं आहे.

तसं होणार नाही

उद्धव ठाकरे गटाने मुंबईतील काही जागांवर दावा केला आहे. त्यावरही वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. दावा करणे आणि आघाडीच्या चर्चेतून निर्णय घेणं हे वेगळं आहे. एखाद्या पक्षाने जागांवर दावा केला तर तो त्यांचा अधिकार आहे. मात्र, शेवटचा निर्णय बैठकीतच होईल. तिन्ही महत्त्वाचे नेते निर्णय घेतली. तिन्ही नेते चर्चा करतील तेव्हाच कोण किती जागा लढवणार हे स्पष्ट होईल. आम्ही सहा जागांवर दावा केला. म्हणजे त्या सहाही आम्हाला मिळतील असं नाही. उद्या शिवसेनेने मुंबईतील 36 जागांवर दावा केला म्हणून शिवसेना 36 जागांवर लढेल असं नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

विदर्भात जास्त जागा द्या

विदर्भात काँग्रेस मजबूत आहे. दोन्ही पक्षाच्या तुलनेत अधिक मजबूत आहे. त्या दोन पक्षांच्या तुलनेत आम्ही मजबूत असल्याने अधिकाधिक जागा काँग्रेस लढली तर सत्तेचा मार्ग सोपा होईल. महाविकास आघाडीला सत्ता मिळण्यामध्ये फार अडचणी येणार नाही. कारण विदर्भातूनच मुंबईच्या विधानभवनाचा मार्ग जाईल. विदर्भात काँग्रेसला अधिकाधिक जागा लढविण्यासाठी आम्ही मित्र पक्षांना सांगितलं आहे. सहकार्य करण्याची विनंती केली आहे. काँग्रेसने किमान 45 जागा लढाव्यात असा सगळ्यांचा सूर आहे. 50 जागांपर्यंत लढलो तरी आम्हाला चांगलं यश मिळेल. इतर भागातील जागा त्यांनी जास्त घ्याव्यात. विदर्भात आम्हाला झुकते माप द्यावा अशी आमची विनंती आहे, असं त्यांनी सांगितलं.

मुंबईत काय आश्वासन मिळालं?

यावेळी त्यांनी लक्ष्मण हाके यांच्या भूमिकेवरही भाष्य केलं. त्यांची भूमिका काय आहे ते त्यांनी मांडलं असावं. त्यांचा मत वेगळं असू शकतं. शरद पवारांची भूमिका मात्र आम्हाला तशी वाटत नाही. मुख्यमंत्री समाजाला बनविण्याचे काम करत आहे. मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा होता तो मुंबईला अडविण्यात आला तेव्हा त्यांना काय लिहून देण्यात आलं? त्यांनी नंतर माघार घेतली त्यांच्या काय मागण्या मान्य केल्या? अशी बनवाबनवी एकनाथ शिंदे समाजाची करत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आमचा आव्हान आहे की, त्यांनी जे काही लिहून दिलं त्याची पूर्तता करा. पवार साहेबांच्या संदर्भात मात्र ते विधान मला योग्य वाटत नाही, असं ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्
...तर महाराष्ट्रात पुन्हा राष्ट्रपती राजवट? सत्तेसाठी फक्त 48 तास अन्.
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?
लाडक्या बहिणीनी कोणाला निवडल? जुन्या भावांना की नवा वायदा करणाऱ्यांना?.
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?
गौतमी अदानींच्या विरोधात अमेरिकेत फसवणुकीचा खटला दाखल, आरोप काय?.
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला
'आव्हाडांनी फ्रान्सची निवडणूक लढवावी','त्या' वक्तव्यावर दरेकरांचा टोला.