Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO: कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोकणच्या दौऱ्यावर आहेत. तौक्ते वादळामुळे रत्नागिरीत झालेल्या नुकसानीची पटोले यांनी पाहणी केली. (congress leader nana patole visits cyclone-hit Ratnagiri)

VIDEO: कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा; नाना पटोलेंचं मुख्यमंत्र्यांना आवाहन
nana patole
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 12:38 PM

रत्नागिरी: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कोकणच्या दौऱ्यावर आहेत. तौक्ते वादळामुळे रत्नागिरीत झालेल्या नुकसानीची पटोले यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी गरज पडल्यास कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना भरीव मदत करा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्वव ठाकरेंना केलं आहे. (congress leader nana patole visits cyclone-hit Ratnagiri)

रत्नागिरीतील नुकसानीची पाहणी केल्यानंतर नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधला. कोकणाचं खूप मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे कोकणातील लोकांना पुन्हा उभं केलं पाहिजे. केंद्र सरकारने महाराष्ट्राला मदत नाही दिली तरी राज्य सरकारने पुढाकार घेऊन कोकणवासियांना मदत द्यावी. कर्ज घ्यावं लागलं तरी चालेल पण लोकांना भरीव मदत करा, असं आवाहन पटोले यांनी केलं आहे. तसेच वस्तुस्थिती आणि तिजोरी पाहून मुख्यमंत्री नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर करतील, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

पंतप्रधान काय फक्त गुजरातचे आहेत का?

पटोले यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्ला केला. भाजपने गलिच्छ राजकारण सुरू केलं आहे. खरंतर ही राजकारण करण्याची वेळ नाही. अडचणीत आलेल्या लोकांना मदत कशी करता येईल, याकडे लक्ष दिलं पाहिजे. नैसर्गिक आपत्तीत केंद्राने मदत केलीच पाहिजे. हा आमचा संवैधानिक अधिकार आहे. केंद्राच्या तिजोरीत महाराष्ट्राचा 40 टक्के हिस्सा जातो हे लक्षात ठेवा, असंही ते म्हणाले. गुजरातला एक हजार कोटी दिले तर महाराष्ट्राला दोन हजार कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र, पंतप्रधानांनी काहीच मदत केली नाही. पंतप्रधान काय फक्त गुजरातचे आहेत का? असा संतप्त सवालही त्यांनी केला.

विरोधकांचं काळीज गोठलं

एकीकडे लोकांना मारायचं आणि दुसरीकडे जागतिक पातळीवर ज्या गोष्टी बॅन आहेत त्याची विक्री करायची असला प्रकार सुरू आहे. लोकांच्या जिवाशी खेळू नका, ही माझी विरोधकांना विनंती आहे. विरोधकांचं काळीज गोठलं आहे. कोट्यवधी लोक मरण पावले आहेत. आपल्या देशात अशी परिस्थिीती कधीच नव्हती. देश स्मशान करण्याचं काम भाजपने केलं आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली. (congress leader nana patole visits cyclone-hit Ratnagiri)

संबंधित बातम्या:

गोबर, गोमूत्र आणि रामदेव ही थेरपी बंद करा; नवाब मलिक कडाडले

आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय, संजय राऊतांची भाजपवर जळजळीत टीका

संजय राऊत म्हणाले, विरोधक हे ब्लॅक फंगस, भाजप म्हणतं, तो तर दीड वर्षापूर्वीच महाराष्ट्राला लागलाय!

(congress leader nana patole visits cyclone-hit Ratnagiri)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.