APMC Election 2023 | पैकीच्या पैकी, यशोमती ठाकूर यांचा भाजपला दे धक्का, काँग्रेसची मोठी मुसंडी

तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी आज मतदान पार पडलं. मतदानानंतर लगेच मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. या मतमोजणीतून महत्त्वाचा निकाल समोर आलाय. हा निकाल राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेले भाजप आणि शिवसेनेला मोठा झटका देणारा आहे,

APMC Election 2023 | पैकीच्या पैकी, यशोमती ठाकूर यांचा भाजपला दे धक्का, काँग्रेसची मोठी मुसंडी
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 9:38 PM

अमरावती : राज्यातील आज वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील तब्बल 147 कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे मतदान पार पडले. यापैकी 37 बाजार समित्यांची मतमोजणी आज पार पडतेय. यापैकी अनेक जागांचा निकाल आज समोर येतोय. विशेष म्हणजे अमरावती जिल्ह्यातील तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीची निकाल हा अनोखा मानला जातोय. कारण या बाजार समितीत सर्वच जागांवर आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाने बाजी मारली आहे. हा निकाल भाजप, शिवसेनेसाठी धक्कादायक आहे.

तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 जागांसाठी आज मतदान पार पडलं. मतदानानंतर लगेच मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. या मतमोजणीतून महत्त्वाचा निकाल समोर आला. तिवसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सर्व 18 जागा आमदार यशोमती ठाकूर यांच्या गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. यशोमती ठाकूर यांच्या गटाने या बाजार समितीत मुसंडी मारली आहे. तर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि प्रहारचा धुव्वा उडला आहे. या निकालानंतर तिवसामध्ये काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून जल्लोष केला जातोय.

कोणत्या बाजार समितीत कोणाची बाजू?

1) दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मविआची बाजी

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. दिग्रस बाजार समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आली आहे. मविआ नेते संजय देशमुख, माणिकराव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन महाविकास आघाडीला 18 पैकी 14 जागी विजयी मिळाला आहे. या निवडणुकीत फक्त 4 जागी संजय राठोड गटाचे संचालक निवडून आले आहेत. हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे संजय देशमुख यांचा मोठा विजय मानला जातोय.

हे सुद्धा वाचा

2) यवतमाळ बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीची बाजी

यवतमाळ बाजार समितीत काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीला 11 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या युतीने गड राखण्यात यश मिळवलं आहे. तर भाजपला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे भाजपला पहिल्यांदाच बाजार समितीत 4 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेस नेते बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वाखाली मविआला इथे विजय मिळाला आहे.

3) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव बाजार समिती भाजपच्या ताब्यात

महागाव बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गेल्या अनेक वर्षांपासूनची बाजार समितीमधील राष्ट्रवादीच्या नाईक परिवाराची सत्ता भाजपने उलथवली आहे. त्यामुळे आता भाजप-शिंदे गटाच्या युतीकडे बाजार समिती गेली आहे. महागावमध्ये भाजप 9 जागी, शिवसेना शिंदे गट 2 जागी तर काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 3 जागा, असा निकाल समोर आला आहे. बाजार समितीत सत्तापालट करण्यात आमदार नामदेव ससाणेंना मोठं यश आलं आहे.

4) यवतमाळच्या बाभूळगाव बाजार समितीत युतीला झटका, मविआची बाजी

यवतमाळच्या बाभूळगाव बाजार समितीत भाजपचे आमदार अशोक उईके यांना धक्का बसला आहे. बाभूळगाव बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. महाविकास आघाडीला 13 तर भाजप-शिंदे गटाला 4 जागांवर यश मिळालं आहे.

5) नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा विजय

नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय मिळाला आहे. महायुतीच्या शेतकरी विकास पॅनलने सर्व सात जागांवर विजय मिळवला आहे. जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीला दिंडोरीतून विजयी मिळण्यास सुरुवात झालीय. भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या नेतृत्वाला हे मोठं यश मिळाल्याचं मानलं जात आहे.

6) नाशिक जिल्ह्यातील देवळामध्ये शेतकरी विकास पॅनलची सरशी

देवळा बाजार समितीवर भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर आणि राष्ट्रवादीचे योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलची सरशी बघायला मिळतेय. शेतकरी विकास पॅनलला सोसायटी आणि ग्रामपंचायत गटाच्या सर्व जागांवर विजय मिळाला आहे. यापूर्वी 8 जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यानंतर आज झालेल्या निवडणुकीत 10 पैकी 7 जागांवर शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत.

7) सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजपची बाजी

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल समोर आलाय. मंगळवेढा बाजार समिती भाजप आमदार समाधान आवताडे यांच्याकडे गेली आहे. या बाजार समितीत आवताडे यांना 13 जागा बिनविरोध तर 5 जागांसाठी आज मतदान पार पडले. आता भाजपाचे आमदार अमाधान आवताडे यांच्याकडे 18 जागा आहेत.

संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.