काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत बैठकांवर बैठका

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज्यात आघाडी करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंघाने दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे […]

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या हालचाली वाढल्या, दिल्लीत बैठकांवर बैठका
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुका तीन ते चार महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही राज्यात आघाडी करण्याच्या दृष्टीने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. याच अनुषंघाने दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आठ जागांवरुन मतभेद आहेत. या जागा कुणाला द्यायच्या, याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र, राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातील बैठकीत या आठ जागांपैकी सहा जागांचा तिढा सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, उर्वरित दोन जागांबाबत अद्यापही तिढा कायम आहे.

आता काँग्रेसची बैठक

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची बैठक संपल्यानंतर, आता काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी काँग्रेसची बैठक पार पडेल. रात्री 9 वाजता ही बैठक नियोजित असून, या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

वाचा : त्या 6 जागा, जिथे काँग्रेस-राष्ट्रवादीला जिंकण्याची पूर्ण हमी!

शरद पवारांसोबतच्या बैठकीत राहुल गांधी यांच्यासोबत मल्लिकार्जुन खर्गे उपस्थित होते. त्यामुळे त्या बैठकीतील माहिती मल्लिकार्जुन खर्गे हे अशोक चव्हाणांना सांगून, पुढील रणनिती आखण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रावादीकडील काही जागा काँग्रेसला हव्या आहेत. त्यात अहमदनगरमधील जागेचाही समावेश आहे. नगरमधील या जागेवरुन काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे पाटील हे लोकसभा लढण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे नगरची जागा राष्ट्रवादीकडून काँग्रेससाठी सोडली जाते का, याकडेही सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी कुठल्याच पक्षाच्या नेत्याने अद्याप अधिकृतरित्या आजच्या बैठकीबाबत माध्यमांना माहिती दिली नाही. त्यामुळे राहुल गांधी आणि शरद पवार यांच्यातील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली आणि कोणत्या जागांचा तिढा सुटला, हे दोन्ही पक्षातील नेते सांगतील, तेव्हाच स्पष्ट होईल.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.