तुम्ही दारु घेता का? अतिवृष्टीची पाहणी करताना अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला भलताच प्रश्न

बीड येथे पाहणी दौऱ्यादरम्यान सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भलताच प्रश्न विचारला. याची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली आहे.

तुम्ही दारु घेता का? अतिवृष्टीची पाहणी करताना अब्दुल सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना विचारला भलताच प्रश्न
अब्दुल सत्तार, कृषीमंत्री Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 10:16 AM

बीड : शिंदे गटाचे आमदार तथा राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत अआले आहेत. अवघ्या महाराष्ट्राला अतिृष्टीने झोडपले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कृषी मंत्री सत्तार हे अतिृष्टीची पाहणी दौरा करत आहेत. बीड येथे पाहणी दौऱ्यादरम्यान सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भलताच प्रश्न विचारला. याची व्हिडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामुळे अब्दुल सत्तारांवर टीकेची झोड उठली आहे.

अतिृष्टीची पाहणी करायला आलेल्या कृषीमंत्र्यांनी थेट जिल्हाधिकारी यांना तुम्ही दारु घेता का? असा प्रश्न विचारला. यावेळी अनेक जण अब्दुल सत्तार यांच्यासह उपस्थित असल्याचे व्हिडिओ दिसत आहे.

अब्दुल सत्तार यांचा प्रश्न ऐकून जिल्हाधिकारी देखील गोंधळले. काय उत्तर द्यावे हेच त्यांना कळेना. पाहणी दौऱ्यादरम्यान एका ठिकाणी चहा-पानासाठी थांबले असताना अब्दुल सत्तार यांनी हा प्रश्न विचारल्याचे व्हिडिओत दिसत आहे.

हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. मंत्री महोदय आणि अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांचा दुःखाचा विसर पडतोय का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

ही व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर विरोधकांनी देखील सत्तार यांच्यावर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचे कृषीमंत्री बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जिल्हाधिकाऱ्यांना विचारतात तुम्ही दारू पिता का? सैराट होऊन सरकार स्थापन केलंय का? असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला.

सैराटच्या नादात हा मिंध्ये गट नसून झिंगे गट आहे की काय? सरकारी अधिकाऱ्याला दारू विषयी विचारतात मग आता यांना झिंगे गट म्हणायचं का? अशी टीकाही मनीषा कायंदे यांनी केली.

वादग्रस्त वक्तव्यामुळे अब्दुल सत्तार नेहमीच चर्चेत असतात. मला कुत्रा निशाणी मिळाली तरीही मी निवडून येतो. असं वक्तव्य करत सत्तार यांनी विरोधकांवर टीका केली होती.

सरकार स्थापन होऊन शंभर दिवस झालेले आहेत. तरी, देखील मतदार संघातील कामे होत नाहीत म्हणून कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार एकनाथ शिंदे यांच्या खासगी सचिवावर भडकले होते. यावरुन देखील मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.