संसदेत नारायण राणे यांच्यांशी झालेल्या गप्पांवर संजय राऊत यांनी केला मोठा खुलाशा

राणे यांनी आदित्य ठाकरेंवर किती घाणरडे आरोप केलेयं, काहीही पुरावे नसताना आदित्य ठाकरे यांना बदनाम केलंय. रश्मी ठाकरेंसंदर्भात ते कोणत्या भाषेत बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय बोलले होते.

संसदेत नारायण राणे यांच्यांशी झालेल्या गप्पांवर संजय राऊत यांनी केला मोठा खुलाशा
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 07, 2023 | 1:29 PM

शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)संघटनात्मक बांधणीसाठी नाशिक (Nashik) दौऱ्यावर गेले आहे. राऊत यांच्या दौऱ्यापुर्वी ठाकरे गटातील 40 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे संजय राऊत यांच्या दौरा चर्चेतील होता. या दौऱ्यात एका क्रिकेट सामन्याच्या उदघाटन प्रसंगी संजय राऊत यांनी बॅट हातात घेतली. अन् त्यांची बॅट तळपताना दिसून आली. मग या तळपलेल्या बॅटेनंतर संजय राऊत यांनी नारायण राणे यांचा चांगलाच समाचार घेत चौफेर फटकेबाजी केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणे राम कदम यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांसमोर बोलतांना नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यांवर जोरदार हल्ला चढवला. राणे म्हणाले, “एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. मी खासदार झालो तेव्हा संसदेत असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचा. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल जे काही सांगायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. ते सांगितल्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना चपलेने नाही मारलं तर बघा…”,

हे सुद्धा वाचा

नारायण राणे यांच्या या आरोपांवर बोलतांना संजय राऊत म्हणाले की, राणे यांनी आदित्य ठाकरेंवर किती घाणरडे आरोप केलेयं, काहीही पुरावे नसताना आदित्य ठाकरे यांना बदनाम केलंय. रश्मी ठाकरेंसंदर्भात ते कोणत्या भाषेत बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय बोलले होते. राणे यांच्या वक्तव्यावर आताच माझे उद्धव ठाकरे यांच्यांशी बोलणे झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे हसत होते. खरंतर राणेंनी पक्ष सोडल्यानंतर मी कधी त्यांना भेटलो नाही. मी कधी बेमान, गद्दांना भेटत नाही. त्यांचं तोंडही पाहत नाही. परंतु राणे यांना आता उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा झाली असेल.त्यांनी आमच्या नादाला यापुढे लागू नये. नाहीतर त्यांना कळेल. या दाखवतो..अशी धमकी संजय राऊत यांनी राणे यांना दिली.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.