Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘..मग राज्यपालांना एवढा अधिकार नाही का?’, मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर चंद्रकांत पाटलांचा सवाल

'राज्यपाल ज्येष्ठ आहेत. त्यांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे. त्यांच्या डोक्यावरची टोपी ही विद्वत्तेची आहे. त्यांनी विरोधकांचे कान उपटले पहिजे. पण ते त्यांना उत्तेजन देत आहेत’, असं संजय राऊत म्हणाले. त्यावरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवलाय.

'..मग राज्यपालांना एवढा अधिकार नाही का?', मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर चंद्रकांत पाटलांचा सवाल
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 11:49 PM

मुंबई : साकीनाका बलात्कार प्रकरण आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात पत्रसंघर्ष पाहायला मिळतोय. त्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांना टोला लगावलाय. ‘राज्यपाल ज्येष्ठ आहेत. त्यांनी विरोधकांचे थोबाड फोडले पाहिजे. त्यांच्या डोक्यावरची टोपी ही विद्वत्तेची आहे. त्यांनी विरोधकांचे कान उपटले पहिजे. पण ते त्यांना उत्तेजन देत आहेत’, असं संजय राऊत म्हणाले. त्यावरुन आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्ला चढवलाय. (Criticism of Chandrakant Patil on the letter written by CM Uddhav Thackeray to Governor)

मुख्यमंत्र्यांच्या पत्रावर पाटलांचा पलटवार

संजय राऊत म्हणाले की राज्यपाल देखावा करत आणि विरोधकांची बाजू घेत आहेत, असं पत्रकारांनी चंद्रकांत पाटलांना विचारलं. त्यावेळी ‘देखावा करण्याचं काय आहे किंवा विरोधकांच्या बाजूनं बोलण्याचं काय आहे. एका सामान्य नागरिकालाही मुख्यमंत्र्यांना असं पत्र लिहिण्याचा अधिकार आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे, महिला असुरक्षित आहेत. राज्यपालांनी अधिवेशन बोलवायचं असतं. मुख्यमंत्र्यांनी बोलवायचं नसतं. मुख्यमंत्र्यांनी विनंती पाठवायची असते, तर राज्यपालांनी त्यावर निर्णय करायचा असतो. राज्यपालांच्या सहीशिवाय अधिवेशन बोलावता किंवा संस्थगित करता येत नाही. मग राज्यपालांना एवढा अधिकारी नाही का? राज्यात महिलांवर अत्याचार सुरु आहेत. साकीनाक्याची घटना काय महाराष्ट्राला भूषणावह आहे का? महाराष्ट्रात लोकशाही लॉक करुन टाकली आहे. संपूर्ण दोन वर्षाच्या काळात दोन दिवसांपेक्षा अधिक काळ अधिवेशन होत नाही. प्रश्नांवर चर्चा होत नाही. प्रश्न विचारताय येत नाहीत. लोकशाहीचा खून होतोय, अघोषित आणीबाणी लागलेली आहे’, अशी घणाघाती टीका पाटील यांनी केलीय.

राज्यसभा निवडणुकीवरुनही पाटलांचा टोला

महाविकास आघाडीतील घटकपक्षांना उघड मतदानाची भीती वाटतेय की एखादी संपूर्ण पार्टीच भाजपसोबत जाईल. कारण प्रतोदला मत दाखवून ते टाकावं लागतं. त्यामुळे क्रॉस व्होटिंगची शक्यता नाही. पण एखादी संपूर्ण पार्टीच येऊ शकते आणि भाजप उमेदवाराला समर्थन देऊ शकते.

‘..तर महाराष्ट्राची परंपरा पाळली असती’

आम्ही निवडणूक लढवू. पण जर राजीव सातव यांच्या कुटुंबात उमेदवारी दिली गेली असती तर आम्ही विचार केला असता. ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. तो ही प्रघात आहे नियम नाही. पण सातव यांच्या घरात उमेदवारी दिली नाही. त्यांच्या पत्नीने मागितली होती. त्यामुळे काँग्रेसनं एकप्रकारे अन्याय केलाय. राज्याच्या संस्कृतीला धक्का पोहोचवला आहे. त्यामुळे भाजपनं उमेदवारी मागे घ्यावी हे गरजेचं नाही. भाजप विचार करेल, लढवेल. आमची तर मतं आहेतच, सोबत अपक्षांचीही मतं आहेत.

इतर बातम्या :

निलंबित आमदारांबाबत भाजपला मोठा दिलासा, निवडणूक आयोगाचा निर्णय काय?

‘…मग मुख्यमंत्र्यांना माहिती तरी काय असतं?’ भाजप प्रवक्त्यांचा खोचक सवाल

Criticism of Chandrakant Patil on the letter written by CM Uddhav Thackeray to Governor

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.