महाराष्ट्रातील खंडणीखोर, वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात

शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनाच मैदानात उतरवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय.

महाराष्ट्रातील खंडणीखोर, वसुली सरकार तुम्हाला इथं हवं आहे का? दादरा नगर-हवेलीतून फडणवीसांचा घणाघात
देवेंद्र पडणवीसांची दादरा नगर-हवेलीत प्रचारसभा
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 2:43 PM

दादरा नगर-हवेली : खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येनंतर दादरा नगर-हवेली लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. शिवसेनेकडून मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर यांनाच मैदानात उतरवण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजप उमेदवारासाठी प्रचारसभा घेतली. त्यावेळी फडणवीस यांनी शिवसेना आणि ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. (Opposition leader Devendra Fadnavis criticizes Shiv Sena and Thackeray government)

शिवसेना दादरा नगर-हवेलीत मृत्यूच्या लाटेचं राजकारण करत आहे. शिवसेना संधीसाधू आहे. पंतप्रधान मोदींच्या नावावर 56 जागा मिळाल्या आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेले असे हे संधीसाधू आहेत. मुंबईत शिवसेनेचा इतिहास पाहा. महाराष्ट्राचे सरकार खंडणीखोर सरकार आहे. ते वसुली करतात, ते तुम्हाला इथे हवे आहेत का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केलाय. ते इथे आले तर नाव महाराष्ट्राचं घेतील आणि काम मुघलांचं करतील, असा घणाघात फडणवीस यांनी केलाय.

‘सत्तेच्या गल्लीत आधी फक्त भ्रष्टाचार चालायचा, तो मोदींनी बंद केला’

आपलं भवितव्य बदलण्यासाठीची ही संधी आहे. देशातील गरीब जनतेसाठी पंतप्रधान मोदींनी योजना केल्या. ना खाऊंगा ना खाने दुंगा, दे मोदींनी देशात करुन दाखवलं. गरीबांसाठी योजना तयार केल्या आणि त्यांची अंमलबजावणी केली हे पहिलं काम मोदींनी केलं. मोदींच्या सरकारमधून दिल्लीतून एक रुपया निघतो आणि तो गरीबांच्या खात्यात जातो. दादरा नगर-हवेलीतही प्रत्येकाला पक्की घरं दिली जातील. महाराष्ट्रात 10 लाख घरं दिली आहेत. आदिवासींपर्यंत मोदींचा विकास पोहोचतोय. मोदींनी घर देताना, गॅस देताना कोणाची जात, धर्म, पंथ पाहिला नाही. आता मोदी आरोग्याची योजना गरीबांपर्यंत पोहोचवत आहेत. जे मागील 60 वर्षात दादरा नगर-हवेलीत पोहोचले नाहीत. ते 7 वर्षात मोदींनी पोहोचवले. आधी सत्तेच्या गल्लीत फक्त भ्रष्टाचार चालायचा. तो मोदींनी बंद केला आणि गरीबांच्या योजनांना प्राधान्य दिल्याचा दावा फडणवीस यांनी केलाय.

कलाबेन डेलकरांसाठी आदित्य ठाकरे प्रचार करणार

कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी युवा सेनेचे अध्यक्ष आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उद्या दादरा नगर-हवेलीला जाणार आहेत. तशी माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील दादरा नगर-हवेलीत प्रचारासाठी येतील अशी माहिती राऊत यांनी यापूर्वी दिली होती. मात्र, अद्याप उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही.

प्रशासन लोकांना गुलामासारखं वागवतं, राऊतांचा आरोप

खासदार संजय राऊत 16 ऑक्टोबर रोजी दादरा नगर-हवेली दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती. मोहन डेलकर यांनी मुंबईत येऊन आत्मबलिदान दिलं. येथील व्यवस्थेनं मोहनभाई यांच्या सारख्या तेज तर्रार नेत्याचा जीव घेतला. अभिनव यांना पाहिल्यावर मोहन डेलकर यांची आठवण येते, असं संजय राऊत म्हणाले सिल्वासा आणि दादरा नगर हवेली कित्येक वर्षानंनतर स्वतंत्र झालेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आझादी का अमृत महोत्सव साजरा करत आहेत. त्यांना मी येथील प्रशासन कसं काम करतंय हे पाहण्यासाठी बोलवतोय. येथील लोकांना गुलांमासारखं वागवलं जातंय. लोक या सत्ताधीशांपेक्षा पोर्तुगीज बरे असं म्हणायला लागले आहेत. शिवसेना येथील लोकांच्या पाठिशी उभं राहणार आहे. मोहन डेलकर यांना न्याय मिळावा म्हणून दादरा नगर हवेलीतील पोटनिवडणुकीत उमदेवार दिला आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

इतर बातम्या :

‘समीर वानखेडे फक्त कलाकारांना पकडत नाहीत’, बॉलिवूडला बदनाम करण्याच्या आरोपावरुन क्रांती रेडकर पतीच्या पाठीशी

‘इंटरव्हलनंतर राऊत बोलणार असतील तर क्लायमेक्स मी करणार’, नितेश राणेंचा शिवसेनेला थेट इशारा

Opposition leader Devendra Fadnavis criticizes Shiv Sena and Thackeray government

एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?
एलिफंटाला जाणारी बोट उलटली, समुद्रात काय झालं? अपघात नेमका कसा झाला?.
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.