कुणालाही मुख्यमंत्री करा पण… दीपक केसरकर यांचं विधान काय?

शालेय शिक्षण विभागाच्या वाचनाचा उपक्रम ठेवण्यात येणार आहे. स्वतः अमिताभ बच्चन यांनी मुलांना वाचण्याचा आवाहन केलं आहे. काही लोकांनी आमची साईट हॅक करायचा प्रयत्न केला. यासंदर्भात आम्ही लवकर पोलीस केस दाखल करणार आहोत. काही लोकांनी फेक सर्टिफिकेट बनवून शासनाची बदनामी करायचा प्रयत्न केला. या संदर्भात सकाळीच मी पोलीस आयुक्तांशी बोललो आहे. हा अपमान शासनाचा आहे आणि मराठी भाषेचा आहे, असं राज्याचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले.

कुणालाही मुख्यमंत्री करा पण... दीपक केसरकर यांचं विधान काय?
cm eknath shindeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 28, 2024 | 7:57 PM

शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्रीपदावरून भुवया उंचावणारं विधान केलं आहे. फिरता मुख्यमंत्री कधी ऐकलं नाही. फिरता चषक ऐकला आहे. कुणालाही मुख्यमंत्री करा. पण महाराष्ट्राला स्टेबल मुख्यमंत्री हवा आहे, असं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. मात्र, या विधानानंतर त्यांनी लगेचच सध्यातरी मुख्यमंत्री पदाचा पहिला पर्याय एकनाथ शिंदे हेच आहेत. एकनाथ शिंदे हे कलेक्टिव्ह नेतृत्व आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा वाटपावर भाष्य केलं होतं. त्यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजही भाजपकडे 100 हून अधिक आमदार आहेत. तरीही मोठा भाऊ, लहान भाऊ ही भावना कुणाच्या मनात नाहीये. भाजपच मोठा भाऊ आहे. पण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच राहतील. जागा वाटपात भाजप मोठा भाऊ ठरेल यात काही शंका नाही, असं दीपक केसरकर यांनी स्पष्ट केलं. बाळासाहेब असताना एक सूत्र होतं. दिल्ली भाजपने सांभाळावी आणि महाराष्ट्र शिवसेनेने, असंही त्यांनी सांगितलं.

भूकंप होणार नाही

महाविकास आघाडीत अस्वस्थता असल्याचं विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. त्यावरही केसरकर यांनी भाष्य केलंय. महाविकास आघाडीत तर अस्वस्थता आहेच. मुख्यमंत्रीपदावरून त्यांच्यात अस्वस्थता आहे. म्हणूनच महाविकास आघाडीवाले मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करत नाहीयेत. त्यांच्यासोबत आता फतवे काढणारे आहेत. तर आमच्यासोबत सच्चे शिवसैनिक आहेत, असं सांगतानाच महायुतीत कोणताही भूकंप होणार नाही. आम्ही विचारधारेच्या मुद्द्यावर सोबत आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांना माहिती देऊ

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली होती. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. महिलांनी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. आम्ही सर्व माहिती राज ठाकरे यांना देऊ आणि त्यांच्या गैरसमज दूर केला जाईल, असं ते म्हणाले.

भेटीही रद्द केल्या

दीपक केसरकर यांनी धर्मवीर सिनेमावरून उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार टीका केली. पाच पाच तास आमदारांना उभ करायचं, साहित्यिकांना बाहेर उभ करायचं, हा अपमान महाराष्ट्राला सहन होत नाही. सिनेमातून हे सत्य बाहेर आलं आहे. मला देखील बाहेर उभ राहावं लागलं आहे. भेटीसाठी बोलावलं असताना भेटही रद्द केल्याचे प्रकार घडले आहेत, असं दीपक केसरकर यांनी सांगितलं.

आम्हीही निवडून आलो असतो

सिनेट निवडणुकीत युवा सेनेला दहा पैकी दहा जागा मिळाल्या आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही सिनेटच्या निवडणुकीत पडलो नाही. आम्हीही मेंबर केले असते तर आम्ही पण निवडून आलो असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

या तिघांचं मिठना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?
या तिघांचं मिठना, आमच्याकडं अजून...जागा वाटपावर काय म्हणाले जानकर?.
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला
लाडकी बहीण योजनेवर राज यांची टीका, म्हणाले की जानेवारीत पगार द्यायला.
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ
मुंबईत हायअलर्ट, मंदिरांसह सर्व महत्वाच्या ठिकाणांच्या सुरक्षेत वाढ.
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की...
गद्दारी पचवण्याचा..... केदार दिघे धर्मवीर-2 बद्दल म्हणाले की....
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?
रेशनवर प्लास्टीक तांदुळ? खासदार प्रणिती शिंदे यांचा आरोप, काय प्रकरण?.
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ
'गिरीशभाऊ गुटखा खात नाही, दारु पित नाही, त्यांना एकच सवय..,'- नाथाभाऊ.
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?
ही सुरुवात आहे, गुलाल उधळलाय... मोठ्या विजयानंतर काय म्हणाले आदित्य?.
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?
आनंद दिघेंना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो, कोणी केला आरोप ?.
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की....
विद्यापीठ सिनेट निवडणूक : सर्व उमेदवार विजयी, संजय राऊत म्हणाले की.....
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड
माजी आमदार राजन पाटील यांची सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड.