Deglur Assembly by Election Result : भाजपला मोठा झटका, काँग्रेसच्या जितेश अंतापूरकरांचा मोठा विजय, सर्वत्र जल्लोष
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसलाय. देगलूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा मोठा विजय झालाय. जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे.
देगलूर : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीप्रमाणे देगलूरमध्येही महाविकास आघाडीला झटका देत विजय मिळवू असा जावा भाजपकडून केला जात होता. मात्र, देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसलाय. देगलूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर यांचा मोठा विजय झालाय. जितेश अंतापूरकर यांनी भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्यावर 41 हजार 933 मतांनी विजय मिळवला आहे. (Congress candidate Jitesh Antapurkar wins in Deglur by Election, BJP candidate Subhash Sabne defeated)
देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत जितेश अंतापूरकर यांना 1 लाखापेक्षा अधिक मतं मिळाली आहेत. तर सुभाष साबणे यांचा 41 हजारापेक्षा अधिक मतांनी पराभव पत्करावा लागलाय. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसनं ही पोटनिवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात लढवली. त्यामुळे चव्हाण यांच्यासाठी ही अस्तित्वाची लढाई ठरली होती. तर भाजपकडूनही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. मात्र, मतदारांवर त्याचा परिणाम दिसून आला नाही.
उमेदवार निहाय मिळालेली मतं
>> जितेश अंतापूरकर – 1 लाख 8 हजार 789 >> सुभाष साबणे – 66 हजार 872 >> उत्तम इंगोले – 11 हजार 347 >> विवेक सोनकांबळे – 465
टपाली मतदानातही अंतापूरकरांना आघाडी
टपाली मतदानातही जितेश अंतापूरकर यांना 51 मतं मिळाली. तर सुभाष साबणे यांना 35, उत्तम इंगोले यांना एक तर विवेक सोनकांबळे यांना दोन मतं मिळाली. तर 1 हजार 103 मतदारांना नोटाला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं.
वडिलांचं स्वप्न पूर्ण करणे हेच प्रथम कर्तव्य- जितेश अंतापूरकर
माझे वडील रावसाहेब अंतापूरकर यांची आज आठवण येतेय. कोरोना काळात रावसाहेब यांनी जनतेची सेवा केली. पण त्याच कोरोनानं त्यांचा मृत्यू झाला. आमचे नेते अशोक चव्हाण यांचं मार्गदर्शन आणि मायबाप जनतेचा आशीर्वाद या बळावर मी विजयी झालो. माझ्या वडिलांचे मतदारसंघासाठी जी काही स्वप्न होती, ती पूर्ण करणे हेच माझं पहिली काम असणार आहे. हा मतदारसंघ अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला आहे. तसंच 2019 ला सुद्धा रावसाहेब अंतापूरकर यांच्यावर मतदारांनी असंच प्रेम केलं होतं. त्यामुळे एवढ्या फरकानं विजय निश्चित होता, अशी प्रतिक्रिया जितेश अंतापूरकर यांनी दिलीय.
जनतेनं दिलेला कौल मान्य- सुभाष साबणे
देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेनं दिलेला कौल आम्ही मान्य करतो. पराभवाने खचून न जाता भाजपमध्ये राहूनच पुन्हा जोमाने कामाला लागू, अशी प्रतिक्रिया पराभव स्वीकारावा लागलेले भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांनी दिलीय.
इतर बातम्या :
मोदी-शहांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेच्या वाघिणीची डरकाळी, लोकसभेला डेलकरांचा विजय, भाजपचा दारुण पराभव
वेतनवाढीचा प्रश्न दिवाळीनंतर सोडवणार, कामावर या; अनिल परबांचं एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन
Congress candidate Jitesh Antapurkar wins in Deglur by Election, BJP candidate Subhash Sabne defeated