Ajit Pawar : पिंपरी चिंचवड महापालिकेतल्या आघाडीसंदर्भात अजित पवारांचं मोठं विधान, म्हणाले…
महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी समन्वय साधावा लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केलं आहे. याचवेळी ज्यांना स्वबळावर लढायचं असेल त्यांनी लढावं, असा टोला त्यांनी काँग्रेस(Congress)ला लगावला.
पिंपरी चिंचवड : महानगरपालिकेतली भाजपाची सत्ता उलथवून टाकणं हेच आपलं पहिलं ध्येय आहे. त्यामुळे यची असेल, तर एक-दोन पावलं मागे होऊयात. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी समन्वय साधावा लागेल, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी केलं आहे. याचवेळी ज्यांना स्वबळावर लढायचं असेल त्यांनी लढावं, असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला.
आघाडीची मानसिकता ठेवा ते म्हणाले, की काँग्रेस(Congress)ला स्वबळावर लढायचं तर लढू दे, आपण आघाडीची मानसिकता ठेवू. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) असल्यानं आता तिकीट वाटप कसं होणार, अशी तुम्ही चर्चा करत असलाच. काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच स्वबळावर लढणार हे जाहीर केलंय. हे मी नव्हे तर त्यांनी आधीच सांगितलंय. त्यामुळे तो प्रश्न मिटलाय, कारण ते आता स्वबळावर लढणार आहेत, असे ते म्हणाले.
‘प्रत्येकाला शुभेच्छा’ पिंपरी चिंचवड(Pimpri Chinchwad)मध्ये कोणाचं किती बळ आहे आणि कोणाचं काय आहे? याचा आपण पंचनामा करायला नको. प्रत्येकाचं बळ चांगलं आहे, अशाच आपण प्रत्येकाला शुभेच्छा देऊयात. पण शिवसेनेची इथं राष्ट्रवादी(NCPसोबत जाण्याची तयारी आहे, असं मी बातमीत वाचलं, अशी माहिती त्यांनी दिली.
‘एक-दोन पावलं मागे होऊ’ ज्यावेळी आपले मित्र पक्ष समन्वयाची भूमिका घेतात, तेव्हा आपण ही दोन पावलं मागे जात पुढं जायचं असतं. तशी मानसिकता आपण ठेवायची असते. परंतु जे आपल्या सोबत येऊ इच्छितात त्यांनी राष्ट्रवादीची आणि स्वतःची इथं किती ताकद आहे, त्या ताकदीच्या प्रमाणावर जागा वाटप झालं तर आपली काहीच हरकत नाही. एखाद्या ठिकाणी ते एक-दोन पावलं मागे होतील, एखाद्या ठिकाणी आपण एक-दोन पावलं मागे होऊयात. शेवटी आपलं सर्वांचं पहिलं ध्येय पिंपरी चिंचवड पालिकेतून भाजपाची सत्ता घालवायची हेच आहे. त्यामुळे ही भूमिका घेऊन तुम्हाला आणि मला पुढं जायचं आहे, असं अजित पवार म्हणाले.