’50 वर्षे वय झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलं’, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सतेज पाटलांना टोला
सतेज पाटील यांचं वय 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलं आहे. किती दिवस काँग्रेस त्यांना राज्यमंत्री ठेवणार, अशी कोपरखळी अजित पवारांनी सतेज पाटलांना लगावली आहे. पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डीमध्ये डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळेचं उद्घाटन पवारांच्या हस्ते करण्यात आलं.
पिंपरी-चिंचवड : उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या वक्तृत्व शैलीसाठी, रोखठोक भाषणासाठी आणि कोपरखळ्यांसाठी ओळखले जातात. पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना अजित पवार यांनी काँग्रेस नेते आणि गृहराज्य मंत्री सतेज पाटील यांना जोरदार टोला लगावलाय. सतेज पाटील यांचं वय 50 वर्ष झालं तरी त्यांना राज्यमंत्रीच ठेवलं आहे. किती दिवस काँग्रेस त्यांना राज्यमंत्री ठेवणार, अशी कोपरखळी अजित पवारांनी सतेज पाटलांना लगावली आहे. पिंपरी-चिंचवडच्या आकुर्डीमध्ये डी. वाय. पाटील ज्ञानशांती शाळेचं उद्घाटन पवारांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी सतेज पाटलांना टोला लगावलाय. (Ajit Pawar’s mischievous remarks on Congress Leader Satej Patil)
पत्रकारांशी बोलाताना अजित पवार यांनी एक खळबळजनक दावा केलाय. पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक नगरसेवक राष्ट्रवादीत येण्यास इच्छूक असल्याचा दावा अजितदादांनी केलाय. मात्र इलेक्टिव्ह मेरिटवर प्रवेश दिला जाईल, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. जरंडेश्वर कारखाना कारवाई संदर्भात बोलताना त्याचा तपास ईडी करत आहे. त्यातून सत्य बाहेर येईल असं पवार म्हणाले. त्याचबरोबर छगन भुजबळांवरही आरोप झाला होता. त्यातून ते निर्दोष मुक्त झाले पण त्यांची दोन वर्षे तुरुंगात गेली त्याचे काय? असा सवालही पवारांनी विचारलाय.
भाजप नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा!
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक आपल्याच नेतृत्वात लढली जाणार असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. इतकंच नाही तर पुण्यातील काही भाजप नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावाही अजित पवार यांनी केला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या या वक्तव्यानं पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली लढली जामार आहे. पुण्यातील काही नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मात्र, मी खालच्या पातळीचं राजकारण करत नाही. भाजपच्या अनेक नगरसेवकांना आम्ही संधी दिली आहे, असं अजित पवार म्हणाले. पालिका हाती असल्यास चांगलं काम होतं, असंही अजित पवार म्हणाले.
‘आजपर्यंत तरी संगळं चांगलं सुरु आहे’
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत केलेल्या संकेताबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना विचारलं. त्यावेळी आम्ही एकत्र काम करत असताना आजपर्यंत तरी चांगलं सुरु आहे. त्यामुळे या वक्तव्याकडे फारसं गांभीर्यानं पाहत नाही. ते राज्याचे प्रमुख आहेत, ते बोलू शकतात, असं अजित पवार म्हणाले.
पुण्यात भाजपचे अनेक नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात?
अजित पवार म्हणाले की, विकासाचं व्हिजन डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही अनेक वर्ष पिंपर-चिंचवडमध्ये कामं केली. मात्र 2013-14 मध्ये नरेंद्र मोदींची देशभरात हवा होती. त्यामुळे चांगलं काम करुनही आम्हाला विरोधात बसावं लागलं. परंतु आता भाजपमधील अनेक नगरसेवक माझ्या संपर्कात आहेत. मी त्यांना सांगतो, की ज्यांना यायचं आहे त्यांनी डिस्क्वालिफाय (अपात्र) झालं नाही पाहिजे. ते निवडणुकीसाठी अपात्र ठरले तर पुढील 6 वर्ष ते निवडणूक लढू शकणार नाहीत. आत्ता जे आले आहेत ते अपक्ष आहेत, किंवा असे काही जण संपर्कात आहेत, ज्यांचे पती नगरसेवक आहेत, किंवा पत्नी नगरसेविका आहे तर तिचे पती पक्षाच्या संपर्कात आहेत.
इतर बातम्या :
का म्हणाले अजित पवार, आम्ही काही साधू संत नाही, राजकारणी आहोत? पालिका निवडणुकीवर मोठं भाष्य
मुख्यमंत्र्यांनी आजी-माजी-भावीचं वक्तव्य केलं आणि चर्चेला उधाण, पण अजित पवारांची प्रतिक्रिया काय?
Ajit Pawar’s mischievous remarks on Congress Leader Satej Patil