Goa Election 2022 : मागच्या वेळेस गडकरी, ह्या वेळेस फडणवीस, गोव्यात ‘कमाल’ करणार? भाजपचा मास्टरप्लॅन काय?
2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांवर ही जबाबदारी सोपवली आहे. या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आता जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी भाजपनं 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी आपले प्रभारी घोषित केले आहेत.
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर भाजपकडून मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 2022 मध्ये होणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांवर ही जबाबदारी सोपवली आहे. या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आता जोरदार तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी भाजपनं 5 राज्यांच्या निवडणुकीसाठी आपले प्रभारी घोषित केले आहेत. त्यानुसार देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा विधानसभेची जबाबदारी सोपवली आहे. (BJP appoints Devendra Fadnavis in charge of Goa Assembly elections)
गोवा विधानसभा निवडणूक
2022 मध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबह, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पाचरी राज्यांच्या निवडणूक प्रभारींची घोषणा केली आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर गोवा राज्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फडणवीस हे भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी म्हणून काम पाहतील यावेळी फडणवीस यांच्यासोबत जी. किशन रेड्डी आणि दर्शना जर्दोश यांच्याकडे सह प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने गोवा में होने वाले आगामी विधान सभा चुनाव के लिए चुनाव प्रभारी एवं सह-प्रभारियों की नियुक्ति की। pic.twitter.com/D4svb8Bjho
— BJP (@BJP4India) September 8, 2021
फडणवीसांना विजयाचा विश्वास
गोवा विधानसभा निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी दिल्याबद्दल पक्षाचे अध्यक्ष नड्डा यांचे आभार मानतो. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात आम्ही पुन्हा एकदा गोव्यात सत्ता स्थापन करु. मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि त्यांच्या मंत्रिमंडळानं गोव्यात जे काम केलं आहे. त्या कामाच्या जोरावर आम्ही ही निवडणूक जिंकू. आमचे लाडके पर्रिकर यावेळी नसतील पण त्यांनी पक्षाला दाखवलेला मार्ग आणि दिशा कायम ठेवत आम्ही वाटचाल करु. महाराष्ट्र नेहमीच गोव्याच्या पाठीशी राहिला आहे. अमित शाह, नितीन गडकरी हे आमच्या पाठीशी आहेत. दोन केंद्रीय राज्यमंत्रीही आमच्यासोबत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही गोव्यात सत्ता मिळवू असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केलाय.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक
तर उतर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर प्रधान यांच्यासोबत अनुराग ठाकूर, अर्जुन मेघावाल, सरोज पांडेय, शोभा कंदरलाजे, कॅप्टन अभिमन्यू, श्रीमती अन्नपूर्ण देवी आणि विवेक ठाकूर यांच्याकडे सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने उत्तर प्रदेश में होने वाले आगामी विधान सभा चुनाव के लिए प्रभारी एवं सह-प्रभारियों के साथ-साथ संगठन प्रभारियों की नियुक्ति की। pic.twitter.com/PvUWtslBGm
— BJP (@BJP4India) September 8, 2021
उत्तराखंड विधानसभा निवडणूक
उत्तराखंडसाठी भाजपनं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्यावर निवडणूक प्रभारीपदाची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्यासोबत लॉकेट चॅटर्जी आणि सरदार आर. पी. सिंह यांनाही सहप्रभारी बनवण्यात आलं आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने उत्तराखंड में होने वाले आगामी विधान सभा चुनाव के लिए चुनाव प्रभारी एवं सह-प्रभारियों की नियुक्ति की। pic.twitter.com/ALxs11NdQx
— BJP (@BJP4India) September 8, 2021
पंजाब विधानसभा निवडणूक
पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी भाजप प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. तर हरदीप पुरी, मिनाक्षी लेखी, विनोद चावडा यांच्यावर सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने पंजाब में होने वाले आगामी विधान सभा चुनाव के लिए चुनाव प्रभारी एवं सह-प्रभारियों की नियुक्ति की। pic.twitter.com/BxmVYsO6kG
— BJP (@BJP4India) September 8, 2021
मणिपूर विधानसभा निवडणूक
मणिपूर विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबत प्रतिमा भौमिक आणि अशोक सिंघल यांची सहप्रभारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने मणिपुर में होने वाले आगामी विधान सभा चुनाव के लिए चुनाव प्रभारी एवं सह-प्रभारियों की नियुक्ति की। pic.twitter.com/p9y6yl2O0D
— BJP (@BJP4India) September 8, 2021
इतर बातम्या :
राणे-ठाकरे पहिल्यांदाच एका मंचावर येणार; सिंधुदुर्गात ऑक्टोबरमध्ये ‘पॉलिटिकल हिट?’
प्रताप सरनाईकांचे अनधिकृत बांधकाम, 21 कोटींचा दंड वसूल करा; सोमय्यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
BJP appoints Devendra Fadnavis in charge of Goa Assembly elections