Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘नागपुरात चमत्कार घडणार नाही, काँग्रेसच्या अपेक्षा फोल ठरणार’, देवेंद्र फडणवीसांचा दावा

देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाजपचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसला अपेक्षा आहे की ते चमत्कार घडवतील. पण काहीही चमत्कार होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे चांगल्या फरकानं विजयी होतील, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

'नागपुरात चमत्कार घडणार नाही, काँग्रेसच्या अपेक्षा फोल ठरणार', देवेंद्र फडणवीसांचा दावा
देवेंद्र पडणवीस, नाना पटोले
Follow us
| Updated on: Nov 26, 2021 | 4:59 PM

संदीप राजगोळकर, दिल्ली : राज्यातील मुंबई, कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबारमधील विधान परिषद निवडणूक (Legislative Council Election) बिनविरोध करण्यात भाजप आणि महाविकास आघाडीतील नेत्यांना यश आलं आहे. मात्र, कोल्हापूर आणि अकोल्यात हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. नागपुरात भाजपचे उमेदवार माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) विरुद्ध काँग्रेस उमेदवार छोटू भोयर (Chotu Bhoyar) निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अशावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी भोयर विजयी होतील असा दावा केलाय. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसच्या आशा फोल ठरतील. विजय बावनकुळेंचाच होईल, असा विश्वास व्यक्त केलाय.

देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यावेळी माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात भाजपचाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेसला अपेक्षा आहे की ते चमत्कार घडवतील. पण काहीही चमत्कार होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे चांगल्या फरकानं विजयी होतील, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

काँग्रेस उमेदवार छोटू भोयर विजयी होतील, पटोलेंचा दावा

भाजपकडून नागपूरची जागाही बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरु होते. मात्र, काँग्रेसच्या काही नेत्यांनी अडेलतट्टू भूमिका घेतल्यामुळे नागपुरात बिनविरोध निवडणूक होऊ शकली नाही, असं धनंजय महाडिक माध्यमांशी बोलताना म्हणाले. त्यामुळे नागपुरात आता माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस उमेदवार छोटू भोयर यांच्यात निवडणूक होणार हे स्पष्ट झालं आहे. दरम्यान, नागपूरसाठी भाजपकडून आम्हाला कुठलाही प्रस्ताव आला नाही. या निवडणुकीत कुणाकडे किती नंबर याला काही महत्व नसतं. काँग्रेस उमेदवार छोटू भोयर विजयी होतील असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. त्यामुळे नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध छोटू भोयर अशी तगडी फाईट होण्याची शक्यता आहे.

भाजपमध्ये संघटनात्मक बदल नाहीत- फडणवीस

दरम्यान पाटील आणि फडणवीस दोघेही दिल्ली दौऱ्यावर आहेत. तसंच या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे भाजपमध्ये संघटनात्मक बदल होणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. मात्र, भाजपमध्ये कुठलेही संघटनात्मक बदल होणार नाहीत. संघटनेच्या पुढील वाटचालीवर बी.एल. संतोष यांच्याशी चर्चा झाली. चार पाच तास त्याच बैठकीत होतो. बाकी कुठलाही अजेंडा नाही, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर नारायण राणे यांनी केलेल्या महाविकास आघाडी सरकार पडण्याच्या दाव्याबाबत विचारलं असता मी ते ऐकलं नाही, असं फडणवीस म्हणाले.

इतर बातम्या :

Breaking : कोल्हापूर विधान परिषद निवडणूक : काँग्रेसचे सतेज पाटील बिनविरोध, अमल महाडिकांचा उमेदवारी अर्ज मागे

Vidhan Parishad Election : मुंबई, कोल्हापूर, धुळे-नंदुरबारमध्ये साटंलोटं! नागपूर आणि अकोल्यात मात्र तगडी फाईट, वाचा सविस्तर

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.