Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Eknath Shinde : शिंदे-फडणवीसांमध्ये मध्यरात्री सव्वातास बैठक, खाते वाटपावर चर्चा; कंबोजही मध्यरात्री बंगल्यावर

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या ॲक्शन मोडमध्ये आहेत. .शुक्रवारी दिवसभर अनेक बैठकांमध्ये दोघांनी भाग घेतलाय तर रात्री जवळपास 12.47 वाजता फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत बंगल्यावर दाखल झाले.

CM Eknath Shinde : शिंदे-फडणवीसांमध्ये मध्यरात्री सव्वातास बैठक, खाते वाटपावर चर्चा; कंबोजही मध्यरात्री बंगल्यावर
शिंदे गटाचेही दोन मंत्री केंद्रात असणारImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 7:02 AM

मुंबई: राज्यात नवं सरकार बनवल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस (devendra fadnavis) यांनी कामाचा सपाटा लावला आहे. दोन्ही नेत्यांनी धडाधड निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. जुन्या सरकारचे निर्णय फिरवले जात असून नवे निर्णय घेतले जात आहे. सर्व खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहे. प्रलंबित कामांचा आढावा घेतला जात आहे. रात्री उशिरापर्यंत हे दोन्ही नेते विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेताना दिसत आहेत. आज बहुमत चाचणीला (floor test) सामोरे जावं लागणार असल्याच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री चर्चा झाली. यावेळी बहुमत सिद्ध करण्याच्या स्ट्रॅटेजीवर चर्चा करण्यात आली. तसेच खाते वाटपावरही चर्चा करण्यात आली. जास्तीत जास्त बंडखोर आमदारांना शिंदे सरकारमध्ये सामावून या बैठकीत चर्चा करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीत खाते वाटपाचं सूत्रं आणि कुणाला मंत्रीपदे द्यायची याचा निर्णय घेण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या ॲक्शन मोडमध्ये आहेत. .शुक्रवारी दिवसभर अनेक बैठकांमध्ये दोघांनी भाग घेतलाय तर रात्री जवळपास 12.47 वाजता फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अग्रदूत बंगल्यावर दाखल झाले. त्यानंतर जवळपास एक तासापेक्षा जास्त काळ दोघांची चर्चा झाली. नंतर रात्री जवळपास 1.50 वाजता फडणवीस मुख्यमंत्र्याचा बंगल्यातून बाहेर निघाले. या एक ते सव्वा तासादरम्यान दोघांमध्ये काय चर्चा झाली ते अजून गुलदस्त्यात आहे. पण मिळालेल्या माहितीप्रमाणे सध्या मंत्रिमंडळ गठन, खाते वाटप आणि त्याचबरोबर विश्वास मत, राज्याच्या इतर काही मुद्द्यांवर या संदर्भात दोघांची चर्चा झाली.

हे सुद्धा वाचा

कंबोज मध्यरात्री मुख्यमंत्री बंगल्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला आले. मध्यरात्री ते अग्रदूत बंगल्यावर आले होते. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे नेते मोहित कंबोज हे देखील उपस्थित होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

मुख्यमंत्री गोव्यात

त्यानंतर फडणवीस निघून गेल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अग्रदूत बंगल्यावरून निघाले आणि रात्री 1.54 मिनिटांवर छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर पोहोचले. तेथून ते गोव्याला निघून गेले. गोव्यात एकनाथ शिंदे गटातले जे आमदार आहेत त्यांच्यासोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. हॉटेल ताजमध्ये हे आमदार आहेत. त्यांच्यासोबत मंत्रीपदाच्या वाटपावर चर्चा करणार आहेत. हे आमदार आज मुंबईत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.