AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा शहाणपणा आधीच्या सरकारला शिकवला असता तर… निधी वाटपावरून फडणवीस आणि दानवे यांच्यात जुंपली

मला सांगा तुम्ही जे स्थगिती आली, स्थगिती आली म्हणता ते पैसे कुठले आहेत? इथलेच पैसे आहेत ना. अडीच वर्षात एकाही आमदाराला फुटकी कवडी मिळाली नाही.

हा शहाणपणा आधीच्या सरकारला शिकवला असता तर... निधी वाटपावरून फडणवीस आणि दानवे यांच्यात जुंपली
| Updated on: Jul 24, 2023 | 1:49 PM
Share

पुणे | 24 जुलै 2023 : अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांना विकास निधी दिला आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गटाच्या आमदारांना अजित पवार यांनी भरभरून निधी दिला. मात्र, विरोधकांना अत्यंत कमी निधी दिला आहे. अजितदादांनी निधी वाटपात भेदभाव केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. या घटनेचे आज विधान परिषदेत पडसाद उमटले. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी उडाली. दोघांमध्येही चांगलीच जुंपली.

निधी वाटपाच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत जोरदार चर्चा झाली. विधानसभा आणि विधानपरिषद आमदारांना असमान निधी वाटप करणे म्हणजे जनतेवर, लोकप्रतिनिधींवर एकप्रकारे अन्यायच आहे. विधानपरिषदेच्या आमदारांना 46 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री यांनी माध्यामांना असमान निधी वाटप झालं नसल्याचं सांगितलं मात्र ते सपशेल चुकीचे आहे, असे अंबादास दानवे यांनी म्हटलं.

विकासाचा अधिकार नाही का?

निधी वाटपाची रक्कम ही जनतेच्या करातून वसूल करून दिली जाते. ज्या मतदारसंघात निधी दिला नाही तेथील जनता कर भरत नाही का? त्यांना विकासाचा अधिकार नाही का? असा सवाल दानवे यांनी उपस्थित करत सरकारला धारेवर धरले. असमान निधी वाटप झाले की नाही याबाबत सरकारने खुलासा करावा तसेच सरकारने याबाबत सुस्पष्ट भूमिका मांडली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. सर्व आमदारांना समान निधी वाटपाबाबत धोरण आखणार का? असा सवालही त्यांनी केला.

एक फुटकी कवडीही दिली नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानेव यांचे सर्व मुद्दे खोडून काढत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. अडीच वर्ष जेव्हा उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, तेव्हा आम्हाला एक नवा पैसा मिळाला नाही. कुणाला किती निधी द्यायचा हे राज्याचा प्रमुख ठरवतो. त्यांच्या सही शिवाय एक नवा पैसा कुणाला खर्च करता येत नाही. अडीच वर्षात एक फुटकी कवडीही आम्हाला दिली गेली नाही. बाकीच्यांना मिळाले ना. कोव्हिड फक्त विरोधी पक्षासाठी होता. सत्ताधाऱ्यांना नव्हता, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.

ही परिस्थिती आली नसती

मला सांगा तुम्ही जे स्थगिती आली, स्थगिती आली म्हणता ते पैसे कुठले आहेत? इथलेच पैसे आहेत ना. अडीच वर्षात एकाही आमदाराला फुटकी कवडी मिळाली नाही. विरोधी पक्षाच्या आमदाराने जे शहाणपण आम्हाला शिकवलं आहे. ते आधीच्या सरकारला शिकवलं असतं तर कदाचित ही परिस्थिती आलीच नसती. विरोधी पक्षाच्या आमदारांना काहीच मिळालं नाही.

सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना प्रचंड निधी मिळाला हा आक्रोश होता. म्हणून स्थगिती मिळाली. नंतर मेरिटच्या आधारे स्थगिती उठवली. आजही आमच्यासोबत राष्ट्रवादी आली. पण जे लोकं नाही आले. त्यांनाही निधी मिळाला. काँग्रेसची नावं दाखवतो. त्यांना याच बजेटमध्ये कोणत्या ना कोणत्या हेडमध्ये निधी दिला आहे, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.