सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी मुकर्रर केलेल्या तारखेलाही शुभेच्छा; राऊतांचा खोचक टोला

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. (devendra fadnavis says government will collapse, sanjay raut slams)

सरकार पाडण्यासाठी फडणवीसांनी मुकर्रर केलेल्या तारखेलाही शुभेच्छा; राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut
Follow us
| Updated on: Apr 13, 2021 | 1:27 PM

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. राजकारणात कोणी कुणाचा शत्रू नसतो. त्यामुळे फडणवीसांना आमच्या गुढी पाडव्याच्या शुभेच्छा आहे. त्यांनी जर सरकार पाडण्यासाठी नवी तारीख मुकर्रर केली असेल तर त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, असा खोचक टोला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला आहे. (devendra fadnavis says government will collapse, sanjay raut slams)

संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा टोला लगावला. देवेंद्र फडणवीस आणि आमचे वैयक्तिक वाद नाहीत. आमचं राजकारणातील युद्ध आम्ही लढूच. त्यामुळे त्यांना गुढी पाडव्याच्या आमच्या शुभेच्छा आहेच. सरकार पाडण्यासाठी त्यांनी एखादी तारीख मुकर्रर केली असेल त्या तारखेलाही आमच्या शुभेच्छा आहेत, असा चिमटा राऊत यांनी काढला.

बंगालचे शिखंडी कोण?

यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर 24 तासांची प्रचार बंदी लादण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त केला. महाभारताचंही युद्ध लढलं गेलं. त्यावेळी शिखंडीला पुढे करून युद्ध लढलं गेलं. पश्चिम बंगालमध्येही युद्ध सुरू आहे. पण पश्चिम बंगालचे शिखंडी कोण आहेत? त्याचा शोध घेतला पाहिजे. कोणत्या शिखंडींना पुढे करून बंगालमधील युद्ध लढलं जातंय हे पाहावं लागेल, अशी टीका राऊत यांनी केली. तसेच ममता दीदींनी नियमभंग केला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण इतरांनी नियमभंग केलाच नाही का? सर्व काही अलबेल आहे का? की दीदींसाठी काही नियम वेगळे आहेत?, असा संतापही त्यांनी व्यक्त केला.

बाहेरून येणाऱ्यांमुळे कोरोना

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती तशी नियंत्रणात आहे. राज्याबाहेरून येणाऱ्या लोकांमुळे महाराष्ट्रात कोरोना वाढत आहे. त्याकडेही लक्ष दिलं पाहिजे, असं ते म्हणाले. देशभरात कोरोना वाढत आहे. लोक कसेही वागत आहेत. लोकांनी नियम पाळले नाही तर संपूर्ण देशात लॉकडाऊन लागू शकतो, असंही ते म्हणाले.

फडणवीस काय म्हणाले होते?

देवेंद्र फडणवीस यांनी काल पंढरपुरातील सभेतून राज्यातील सत्ताबदलाबाबत भाष्य केलं होतं. सरकार कधी बदलायचं ते माझ्यावर सोडा, लवकरच बदलू, अशा शब्दात फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला एकप्रकारे सूचक इशाराच दिला होता. (devendra fadnavis says government will collapse, sanjay raut slams)

संबंधित बातम्या:

फडणवीसांचा सभांचा धडाका; भाजपलाही पंढरपुरात पावसाच्या चमत्काराची आस!

आता देवेंद्र फडणवीसांच्या सभेत पाऊस आणि वादळ, ठाकरे सरकारवर बरसले

पहिल्यांदाच आमदार आणि मंत्रीही, ‘मामांची कृपा?’; वाचा, कोण आहेत प्राजक्त तनपुरे?

(devendra fadnavis says government will collapse, sanjay raut slams)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.