‘हे सरकार आहे की तमाशा? कोण काय करतं ते दुसऱ्याला माहीत नसतं’, फडणवीसांचा घणाघात

नागपूरमध्ये पदवीधर मेळाव्यात संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला (Devendra Fadnavis slams maha vikas aghadi government).

'हे सरकार आहे की तमाशा? कोण काय करतं ते दुसऱ्याला माहीत नसतं', फडणवीसांचा घणाघात
Follow us
| Updated on: Nov 29, 2020 | 3:03 PM

नागपूर : “हे सरकार आहे की तमाशा? कोण काय करतं ते दुसऱ्याला माहीत नाही. मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. यामुळे महाराष्ट्राचं मोठं नुकसान होत आहे”, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. नागपूर पदधीवर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज (29 नोव्हेंबर) भाजपकडून पूर्व विदर्भ पदवीधर मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला भाजप नेते नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. या मेळाव्यात संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला (Devendra Fadnavis slams maha vikas aghadi government).

“या सरकारने एकही काम केलं नाही. नागपुरात जे काम दिसत आहे ते नितीन गडकरी यांनी केलेलं दिसत आहे. आम्ही सुरु केलेल्या कामांना यांनी स्थगिती दिली. शेतकऱ्यांना दिलेलं वचन यांच्या लक्षात नाही. मात्र मुख्यमंत्रीपदाचं वचन त्यांच्या बरोबर लक्षात आहे”, असा टोला फडणवीसांनी लगावला.

“तीन पक्ष एकत्र येऊन भाजपला एकटं पाडू, असा या सरकारने प्रयत्न केला. मात्र भाजपवर लोकांचा विश्वास आहे. त्यामुळे काहीच फरक पडत नाही. भाजपने कोरोना काळातसुद्धा देशभरात झालेल्या निवडणुका जिंकल्या”, असं फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis slams maha vikas aghadi government).

“शिवसेनेने विश्वासघात करत तीन पक्षाचे सरकार स्थापन केलं. आता या सरकारला एक वर्ष झालं. पण एक वर्षात आपण काय काम केलं याबाबत एकही मंत्री सांगू शकला नाही”, अशी टीका फडणवीस यांनी केली. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या पूर्ण मुलाखतीत धमकवणारी भाषा वापरली, असा दावा त्यांनी केला.

“आम्ही ओबीसी मुलांना जगात चांगल्या ठिकाणी शिकता यावं यासाठी योजना आणली. हे मात्र काय करतात माहीत नाही. ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिलं. मात्र या सरकार मधील मंत्री वेगवेगळ्या भूमिका मांडून नवे वाद निर्माण करत आहे. लोकांच्या मनात चुकीच्या गोष्टींबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जनतेला सगळं माहीत आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“पुढचे दोन दिवस पदवीधर निवडणुकीसाठी महत्वाचे आहेत. नागपूरची ही जागा फार महत्वाची आहे. नितीन गडकरी यांनी दोन दशके हा मतदार संघ गाजवला. त्यांनी विकास करून दाखवला. आता देखील नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी कोरोना काळात जमिनीवर उतरून कार्य करणारे आणि समाजात मोठं काम करणारा उमेदवार तुमच्या समोर आहे”, असंदेखील फडणवीस म्हणाले.

नागपुरात भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत

नागपूर पदवीधर मतदारसंघावर (Nagpur Graduate Constituency Election) आजपर्यंत भाजपचं वर्चस्व राहिलं आहे. त्यामुळे भाजपसाठी ही प्रतिष्ठेची लढत झाली आहे. एकूण 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असले, तरी या मतदारसंघात भाजप आणि काँग्रेस यांच्यातच थेट लढत आहे. भाजपने दिग्गज नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवत संदीप जोशी (Sandeep Joshi) यांच्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस उमेदवार अभिजित वंजारी (Abhijeet Vanjari) यांच्यासाठीही शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या महाविकास आघाडीने जोर लावला आहे. नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार याद्यांमुळे 28 टक्के मतदार घटले, याचा कुणाला फायदा होणार आणि कुणाला तोटा होणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे

संबंधित बातमी :

नागपूर पदवीधर मतदारसंघ स्पेशल रिपोर्ट : भाजप बालेकिल्ला राखणार, की काँग्रेस गड खेचून आणणार?

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.