संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले

विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. (devendra fadnavis slams sanjay raut)

संजय राऊतांची राज्यपालांवरील टीका हा पोरखेळ; देवेंद्र फडणवीसांनी फटकारले
Devendra fadnavis
Follow us
| Updated on: May 24, 2021 | 3:52 PM

नागपूर: विधान परिषदेच्या सदस्यांच्या नियुक्तीवरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली होती. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांना फटकारले आहे. राऊतांची राज्यपालांविरोधातील टीका म्हणजे निव्वळ पोरखेळ आहे. त्याला काय उत्तर द्यायचं?, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी राऊत यांचा समाचार घेतला आहे. (devendra fadnavis slams sanjay raut)

राजभवनात कोणतं भूत आहे? विधानपरिषद सदस्यांच्या नियुक्तीच्या फायली कोणत्या भुताने पळवून नेल्या?, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्याबाबत देवेंद्र फडणवीस यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राजभवनातील विधान परिषदेच्या आमदारांच्या यादीबाबत राजभवनच उत्तर देईल. त्यावर मी बोलू शकत नाही. पण भुताटकी, भुताचा वावर ही कसली विधाने आहेत. हा निव्वळ पोरखेळ आहे. असा पोरखेळ कुणीही करू नये, अशी टीका फडणवीस यांनी केली.

राऊतांना कामधंदा नाही

संजय राऊत यांना काही कामधंदा नाही. ते दिवसभर काहीबाही बोलत असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर थोडीच उत्तर द्यायचं असतं, असं सांगत त्यांनी अधिक बोलण्यास नकार दिला.

संभाजीराजेंशी भेट ठरली

मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजी छत्रपती राज्याचा दौरा करणार आहेत. त्यावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. संभाजी छत्रपती यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ते 28 मे रोजी मला भेटणार आहेत. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यात येईल, असं ते म्हणाले.

राऊत नेमकं काय म्हणाले होते?

दरम्यान, राऊत यांनी दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातूनही राज्यपालांवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांनी करावीत अशी अनेक कामे आहेत. फायलींवर बसून राहण्यापेक्षा ही कामे केल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल. महाराष्ट्रात लसीचा तुटवडा आहे. याबाबत राज्यपालांनी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. ‘तौकते’ चक्रीवादळात नुकसान झाले. पंतप्रधानांनी गुजरातच्या वादळग्रस्तांना हजार कोटी दिले. मग महाराष्ट्रावर अन्याय का करता? माझ्या राज्यालाही पंधराशे कोटी द्या, अशी मागणी करून राज्यपालांनी ‘मऱ्हाटी’ जनतेची मने जिंकली पाहिजेत. हे सर्व करायचे सोडून राज्यपाल सहा महिन्यांपासून एका फाईलचे राजकारण करीत आहेत. आता तर ती फाईलही भुतांनी पळविली. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल! असा खोचक सल्ला ‘सामना’तून देण्यात आला आहे. (devendra fadnavis slams sanjay raut)

संबंधित बातम्या:

सर्जिकल स्ट्राईकही 24 तासात झाला होता, पण राज्यपालांचं संशोधन सुरूच; राऊतांची खोचक टीका

राजभवनात भुताटकीचा वावर, एकदा शांतीयज्ञ करून घ्या, शिवसेनेचं टीकास्त्र

वादळ 4 तास थांबलं, मुख्यमंत्री 3 तासही थांबले नाहीत, प्रवीण दरेकरांची खोचक टीका

(devendra fadnavis slams sanjay raut)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.