Devendra Fadnavis : संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे, सेन्सिबल माणसाविषयी विचारा; फडणवीस यांचा टोला

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एकटेच आले आहेत. गेल्या पंधरा दिवसातील हा त्यांचा तिसरा दिल्ली दौरा आहे. यापूर्वी ते दोनदा दिल्लीत आले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी मात्र ते एकटेच दिल्लीत आले आहेत.

Devendra Fadnavis : संजय राऊतांना आता तरी समज आली पाहिजे, सेन्सिबल माणसाविषयी विचारा; फडणवीस यांचा टोला
संजय राऊतांबद्दल काय विचारता? सेन्सिबल माणसाविषयी विचारा; फडणवीस यांचा टोलाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 24, 2022 | 1:00 PM

नवी दिल्ली: विरोधकांचं कामच असतं टीका करणं. त्यांच्या असंवेदनशीलतेमुळेच ही परिस्थिती आली आहे. आम्ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच करतो. संजय राऊतांना (sanjay raut) आता तरी समज आली पाहिजे. काय त्यांनी पक्षाची अवस्था करून टाकलीय. तुम्ही मला कशाला त्यांच्याबद्दल विचारता? सेन्सिबल माणसाबद्दल विचारा, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत आले आहेत. यावेळी ते मीडियाशी संवाद साधत होते. फडणवीस यांचा हा दिल्लीतील गेल्या पंधरा दिवसातील तिसरा दौरा आहे. या दौऱ्यात फडणवीस भाजपच्या (bjp) अनेक ज्येष्ठ नेत्यांना भेटणार असल्याचं सांगितलं जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर या दौऱ्यात चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे फडणवीस यांच्या या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

24 दिवसात 89 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकारला अपयश आलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार केला जात नाही. त्यामुळे जनतेची आणि शेतकऱ्यांची अनेक कामे रखडली आहेत. त्याबाबत फडणवीस यांना विचारण्यात आलं असता विरोधकांचे काम आहे टीका करणे. त्यांच्या असंवेदनशीलतीमुळे ही परिस्थिती आली आहे, असं फडणवीस म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत लवकरच निर्णय होईल, काळजी करू नका, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

बदल होत असतात, त्यात नवीन काय?

राजकारणात बदल होत आहेत. सत्ताकारण होत आहे, असं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं होतं. त्यावर राजकारणात बदल तर होतच असतात. त्यात नवीन काय? असा सवाल फडणवीस यांनी केला.

फडणवीस एकटेच दिल्लीत

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत एकटेच आले आहेत. गेल्या पंधरा दिवसातील हा त्यांचा तिसरा दिल्ली दौरा आहे. यापूर्वी ते दोनदा दिल्लीत आले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यावेळी मात्र ते एकटेच दिल्लीत आले आहेत. त्यामुळे दिल्लीत पक्षाच्या नेत्यांशी त्यांची महत्त्वाची चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावरही चर्चा होणार आहे. तसेच कुणाला कोणती खाती द्यायची यावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे या दौऱ्याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.

राऊतांचं आव्हान

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज सकाळीच फडणवीसांना आव्हान दिलं होतं. तुम्ही माझ्यावर कोणत्याही तपास यंत्रणांच्या माध्यमातून कारवाई करा. मी घाबरणार नाही. प्रत्येक गोष्टीला सामोरे जाईल, असं सांगतानाच तुमचे सर्व कारनामे मला माहीत आहेत, असा इशाराच राऊत यांनी दिला होता.

मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.