पुढचे 25 वर्ष राजकारणातच राहणार; संन्यास घेण्याच्या विधानानंतर फडणवीसांची सारवासारव

फडणवीसांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी तोंडसुख घेतलं. त्यावर आज फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनीही या मुद्द्यावरुन फडणवीसांना छेडलं. त्यावेळी आपण पुढील 25 वर्षे तरी राजकारण आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

पुढचे 25 वर्ष राजकारणातच राहणार; संन्यास घेण्याच्या विधानानंतर फडणवीसांची सारवासारव
देवेंद्र फडणवीस
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 7:43 PM

मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपच्या राज्यव्यापी आंदोलनात राजकीय संन्यास घेण्याबाबत एक विधान केलं होतं. त्यावरुन सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांना जोरदार टोलेही लगावले होते. तोच मुद्दा आज पत्रकारांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. त्यावेळी पुढील 25 वर्षे तरी राजकारणात राहणार असल्याचं सांगत फडणवीस यांनी आपल्या राजकीय संन्यासाच्या वक्तव्यावर सारवासारव केल्याचं पाहायला मिळालं. (Devendra Fadnavis’s reply at press conference on his own statement of political retirement)

26 जून रोजी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपनं राज्यव्यापी आंदोलन पुकारलं होतं. त्यावेळी नागपुरात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार निशाणा साधला. सरकारच्या नाकर्तेपणामुळे आरक्षण गेलंय, पण माझ्या हातात पुन्हा सूत्रं दिली तर ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळवून देईन नाहीतर राजकारणातून संन्यास घेईन, असं मोठं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. फडणवीसांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी तोंडसुख घेतलं. त्यावर आज फडणवीसांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनीही या मुद्द्यावरुन फडणवीसांना छेडलं. त्यावेळी आपण पुढील 25 वर्षे तरी राजकारण आहोत, असं फडणवीस यांनी म्हटलंय.

फडणवीस नेमकं काय म्हणाले?

“या पुढे मी २५ वर्षे राजकारण करणार आहे. त्यामुळे मी जेव्हा एखादी गोष्ट बोलतो ती विचारपूर्वक बोलतो. मलाही माहीत आहे की, संन्यास घ्यायची गरजच पडणार नाही. कारण जे करण्यासारखं आहे ते हे लोक करतच नाहीये. विचारपूर्वक बोललो. जे करता येण्यासारखं आहे ते करत नाही म्हणून मी तो विषय बोललो. विचारपूर्वक बोललो. आणि हे खरचं आहे. महाराष्ट्रातील राजकारणाला सर्वांची गरज आहे. माझी गरज आहे, त्यांची गरज आहे. यांची गरज आहे. राजकारण एकाच पक्षाचं नसतं. राजकारणात पक्ष पाहिजे, विरोधक पाहिजे. सर्व पक्षाचे लोकं पाहिजे. ठिक आहे. त्यांच्या शुभेच्छा समजूया”, असं फडणवीस म्हणाले.

‘लोकशाहीच्या सगळ्या प्रथा, परंपरा, पांयडे पायदळी तुडवल्या’

महाविकास आघाडी सरकारच्या काळात लोकशाहीला कुलुप ठोकण्याचं काम केलं गेलं आहे. लोकशाहीच्या सगळ्या प्रथा, परंपरा, पांयडे पायदळी तुडवून उद्याच काही बिल मांडण्यात येणार आहेत. तर, परवा पुरवण्या मागण्या मांडण्यात येणार आहेत. महाराष्ट्रात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण या संदर्भात पुरवणी मागण्यांमध्ये उल्लेख नसेल तर त्यावर बोलता येणार नाही, असं फडणवीस म्हणाले. राज्यात मोठ्या प्रमाणावर शेतकरी अडचणीत आहेत. शेतकरी अडचणीत आहेत. दुधाच्या दराचा प्रश्न आहे. दूध दर 15 रुपयांवर गेलेला आहे. सोयाबीन, आंबा कापूस या पिकांचे प्रश्न आहेत. राज्यात गुंतवणुकीचा ओघ थांबलेला आहे, त्यावर चर्चा थांबलेली आहे. धानाचा प्रश्न गंभीर आहे, असे अनेक मुद्दे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केले.

संबंधित बातम्या :

VIDEO: विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल असं वाटत नाही; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

‘अधिवेशनात जे मुद्दे मांडू दिले जाणार नाहीत ते जनतेच्या फोरमवर जाऊन मांडू’, फडणवीसांचा ठाकरे सरकारला इशारा

Devendra Fadnavis’s reply at press conference on his own statement of political retirement

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.