अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, लागोपाठ दुसऱ्या मंत्र्याचं मोठं विधान; पडद्यामागे काय घडतंय?

अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझीच नाही तर गल्लीपासून दिल्लीश्वरांची इच्छा आहे. दिल्लीतील कोणत्या कोणत्या नेत्यांची इच्छा आहे हे मी सांगायची गरज नाही, असं सूचक विधानही अनिल पाटील यांनी केलं आहे.

अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होतील, लागोपाठ दुसऱ्या मंत्र्याचं मोठं विधान; पडद्यामागे काय घडतंय?
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 11:28 AM

मुंबई | 24 जुलै 2023 : अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले असले तरी ते लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या दिवशी तर भावी मुख्यमंत्री असं लिहिलेले बॅनर्स लागले होते. त्यातच आमदार अमोल मिटकरी यांनी एक ट्विट करून या चर्चांना फोडणी दिली. ही चर्चा थांबत नाही तोच काल मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीश्वरांची इच्छा असल्याचं म्हणून या चर्चांचा धुरळा उडवून दिला. आता राज्यातील एक महत्त्वाचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनीही अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदावरून भाष्य केल्याने पडद्यामागे काय चाललंय? अजितदादांना मुख्यमंत्री करण्यासाठीची ही वातावरण निर्मिती तर नाही ना? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

धर्मरावबाबा अत्राम यांनी मीडियाशी संवाद साधताना हे भाष्य केलं आहे. भविष्यामध्ये अजित पवार हे मुख्यमंत्री व्हायला हवे अशी आमची भावना आहे. ते लवकरच मुख्यमंत्री होतील, असं आम्हाला वाटतं. पण सध्याचे सरकारही चांगलं काम करत आहे, असंही

परिस्थिती कंट्रोलमध्ये

गडचिरोली जिल्ह्याचा चाळीसगावशी संपर्क तुटला होता. गावं पुन्हा एकदा संपर्कात यायला सुरुवात झालेली आहे. तिथलीची परिस्थिती बिकट होती. ती परिस्थिती आता सर्वसामान्य व्हायला सुरुवात झाली आहे. हिरोंच्या गोंदिया हा जो भाग आहे जो नागपूरपासून वेगळा झाला होता. या सगळ्या भागांची जोडणी पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. तिथली परिस्थिती आता कंट्रोलमध्ये आहे. पाणी उचलत आहे आणि जनजामान्या सुरळीत करण्यास आम्ही देखील प्रयत्न करत आहोत, असं अत्राम यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

कोणताही दुजाभाव नाही

यावेळी त्यांनी विकास निधीतील भेदभावावरही भाष्य केलं. निधी पुन्हा एकदा देण्यात आलेला आहे. सर्व आमदारांना हा निधी दिला जातोय आणि योग्य पद्धतीने हा निधी मिळालेला आहे. निधीमध्ये कुठलाही दुजाभाव झालेला नाहीये, असं अत्राम म्हणाले.

पाटील काय म्हणाले?

दरम्यान, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनीही अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत ही आमची इच्छा असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही माझीच नाही तर गल्लीपासून दिल्लीश्वरांची इच्छा आहे. दिल्लीतील कोणत्या कोणत्या नेत्यांची इच्छा आहे हे मी सांगायची गरज नाही, असं सूचक विधानही अनिल पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आआहे.

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.