Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्र्यांचा अजित पवार, काँग्रेसला धक्का? प्रभाग रचनेवर कॅबिनेटमध्ये मतभेद? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर

प्रभाग रचनेवरुन आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खल झाल्याची माहिती मिळतेय. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे चार सदस्यी प्रभाग रचनेच्या बाजूने होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना द्विसस्यीय प्रभाग रचना हवी होती.

मुख्यमंत्र्यांचा अजित पवार, काँग्रेसला धक्का? प्रभाग रचनेवर कॅबिनेटमध्ये मतभेद? नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 8:28 PM

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं प्रभाग आणि वॉर्ड रचनेबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल. नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असणार आहे. दरम्यान, या निर्णयावरुन महाविकास आघाडीत मतभेद होते, अशी माहिती मिळतेय. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यममार्ग काढल्याचं सांगितलं जात आहे. (Disagreement in Mahavikas Aghadi over the formation of Municipal Corporation Ward)

प्रभाग रचनेवरुन आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मोठा खल झाल्याची माहिती मिळतेय. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे हे चार सदस्यी प्रभाग रचनेच्या बाजूने होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना द्विसस्यीय प्रभाग रचना हवी होती. हे नेते आपल्या मागणीवर अडून होते. मात्र शेवटी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यममार्ग काढत 3 सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादीला मोठा धक्का!

दरम्यान, आगामी 18 पालिका निवडणुकीसाठी प्रभागाऐवजी एक सदस्यीय वार्ड पद्धत जाहीर केली होती. पण आता मुंबई वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांची माघार?

2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच विद्यमान सरकारनं कायद्यात बदल करत पुन्हा एक सदस्यीय वार्ड पद्धत आणली होती. अजित पवार यांनी पुढाकार घेत प्रभाग पद्धती रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मुंबई महापालिका वगळता इतर महापालिका निवडणुकीसाठी तिन सदस्यीय प्रभाग पद्धतीचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आणि काँग्रेस नेत्यांच्या दबावापुढे अजित पवारांना माघार घ्यावी लागल्याचं बोललं जात आहे.

‘महाविकास आघाडीचा एकमताने निर्णय’

प्रस्ताव हा चार सदस्यीय प्रभागाचा होता. पण मंत्रिमंडळातील काही नेत्यांचं म्हणणं होतं की 3 सदस्यीय प्रभागच योग्य ठरेल. त्याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी 3 सदस्यी प्रभाग निश्चित केला. नगरपरिषद आणि नगरपालिकेत 2, तर नगर पंचायतीमध्ये 1 प्रभाग पद्धत असेल. यामुळे त्या भागातील नागरिकांना नागरी सुविधा देणं सोयीचं ठरेल, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय महाविकास आघाडीने एकमताने घेतला आहे, अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलीय.

प्रभाग रचना करताना फडणवीसांचा दबाव होता का?

‘न्यायालयात कोणं जातं हे मला माहिती नाही. न्यायालयात कुणीही जाऊ शकतो. पण राज्य सरकारनं हा जो काही निर्णय घेतला आहे तो कुठलाही राजकीय अभिनिवेश ठेवून किंवा राजकीय फायदा होईल असं डोक्यात ठेवून घेतला नाही. तर या प्रभाग रचनेचा फायदा लोकांना नागरी सुविधा मिळण्यासाठी होईल हाच उद्देश राज्य सरकारनं डोळ्यासमोर ठेवला आहे’, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय.

सध्याची महापालिकानिहाय प्रभाग रचना

ठाणे – 4 सदस्य प्रभाग वसई विरार – 3 सदस्य प्रभाग नवी मुंबई – 1  सदस्य प्रभाग पनवेल – 4 सदस्य प्रभाग नाशिक – 4 सदस्य प्रभाग पुणे – 4 सदस्य प्रभाग पिंपरी – 4 सदस्य प्रभाग नागपूर – 4 सदस्य प्रभाग कोल्हापूर  – 1 सदस्य प्रभाग

इतर बातम्या :

महापालिका निवडणूक 2022 : मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांसाठी 3 सदस्यीय प्रभाग पद्धत!

महापालिका प्रभाग पद्धत ते साखर कारखान्यांच्या अल्पमुदत कर्जास सरकारची थकहमी, ठाकरे सरकारचे 11 मोठे निर्णय

Disagreement in Mahavikas Aghadi over the formation of Municipal Corporation Ward

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.