लोकसभेच्या या जागेवरून महायुतीत तिढा, शिवसेना-राष्ट्रवादी समोरासमोर

Pune Maval Lok Sabha constituency | पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभेच्या जागेवरुन वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहा जानेवारी रोज मावळमध्ये येत आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा हा शुभारंभ मानला जात आहे. परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून याला विरोध होत आहे.

लोकसभेच्या या जागेवरून महायुतीत तिढा, शिवसेना-राष्ट्रवादी समोरासमोर
eknath shinde ajit pawar
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 11:23 AM

रणजित जाधव, मावळ, पुणे, दि. 4 जानेवारी 2024 | लोकसभा निवडणूक आता काही महिन्यांवर आली आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए तर काँग्रेसच्या नेतृत्वात इंडिया आघाडी निवडणुकीची तयारी करत आहे. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपांची बोलणी सुरु झाली आहे. परंतु महायुतीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरु झाला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळ लोकसभेच्या जागेवरुन वाद निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहा जानेवारी रोज मावळमध्ये येत आहे. विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा हा शुभारंभ मानला जात आहे. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे. यामुळे मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीत तिढा वाढला आहे.

पार्थ पवारासाठी आग्रह

मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वीच राष्ट्रवादीकडून बारणेंच्या उमेदवारीलाचं विरोध होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मावळ लोकसभेत सभा घेत आहेत. ही सभा म्हणजे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ मानला जात आहे. परंतु अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांनी बारणे यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेळके यांनी मतदारसंघावरील दावा कायम ठेवला आहे. अजित पवारांचे पुत्र पार्थ साठी शेळके हा आग्रह करतायेत, अशी चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.

काय म्हणतात शेळके

सुनील शेळके सुद्धा पार्थ पवार यांच्या चर्चांना स्पष्टपणे नाकारत नाहीत. “दादा म्हणतील तसं” असं म्हणत शेळके खासदार बारणेंना सूचक इशारा दिला आहे. महायुती म्हणून फक्त राष्ट्रवादी काँग्रेसने नैतिकता सांभाळायची का? बारणे यांना उमेदवारी देऊन तुम्ही जनतेला गृहीत धरताय का? असे प्रश्न उपस्थित करत बारणेंना उमेदवारी देताना मुख्यमंत्र्यांसह भाजपने विचार करावा, असे म्हणत सुनील शेळके यांनी बारणे यांना उमेदवारी न देण्याचा इशारा दिलाय. यामुळे लोकसभेच्या पुणे जिल्ह्यातील जागेवरुन महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये वाद निर्माण होणार आहे, अशी चिन्ह दिसत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.