‘राजीव तुम्हाला मिस करतेय’, काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्या राजीव सातव यांच्या आठवणीने गहिवरल्या

'राजीव तुम्हाला मिस करतेय', काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक
प्रज्ञा सातव यांची विधान परिषद पक्की झाल्याचं खात्रीलायक वृत्त
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 1:48 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे. उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर त्या राजीव सातव यांच्या आठवणीने गहिवरल्या. याअगोदर हिंगोलीत मी राजीवच्या साथीने काम करायचे पण आज मी एकटी पडलीय, अशावेळी राजीवला मिस करतीय, असं म्हणत त्यांनी राजीव यांच्या आठवणी जागवल्या.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत उपाध्यक्ष, महासचिव, सचिव, प्रवक्त्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर काँग्रेसनं 14 जिल्हाध्यक्षांच्या निवडीही जाहीर केल्या आहेत. यामध्ये उपाध्यक्ष म्हणून काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना स्थान देण्यात आलं आहे.

काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रज्ञा सातव यांची नियुक्ती

प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्ष म्हणून  निवड झाल्यानंतर टीव्ही 9 मराठीने त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजीव सातव यांची क्षणाक्षणाला आठवण येत असल्याचं सांगितलं. तसंच मिळालेली संधी मोठी आहे. कामाला मोठी स्पेस आहे. या कामात राजीवजींच्या कार्यकर्त्यांचं मोठं पाठबळ असेल. मी चांगलं काम करुन दाखवेन, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

राजीव तुम्हाला मिस करतीय

प्रज्ञा सातव म्हणाल्या, “याअगोदर हिंगोली जिल्ह्यात राजीवजींच्या खांद्याला खांदा काम केलंय. निवडणूक काळात आणि राजीवजी दिल्लीत असताना मी मतदारसंघात फिरायचे, लोकांना भेटायचे. पण त्यावेळी राजीवजींचं मार्गदर्शन असायचं. पण सध्या जबाबदारी मोठी मिळालेली आहे. अशावेळी राजीवजींची उणीव नक्की भासेल”, असं त्या म्हणाल्या.

चांगलं काम करुन दाखवेन, पक्षनेतृत्वाला दिला विश्वास

“काँग्रेस कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी कठीण काळात माझ्या पाठीशी होते. आजही निवडीनंतर अनेकांचे फोन आले. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांचं सातत्याने मार्गदर्शन असतं. राज्यातील नेतेमंडळीही पाठीशी उभे आहेत. आता मिळालेल्या जबाबदारीनंतर आव्हान जरी मोठं असलं तरी कामाला संधी असल्याने उत्तम काम करण्याचा नक्की प्रयत्न करेन”, असं त्या म्हणाल्या.

काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत जातींचा समतोल

महाराष्ट्र काँग्रेसच्या 190 जणांच्या कमिटीमध्ये मराठा 43, मुस्लिम 28, ब्राह्मण 11, ओबीसी 11, एससी 10, धनगर 7, आगरी 6, लिंगायत 6, माळी 5, मारवाडी 4, मातंग 4, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जातीना स्थान देण्यात आलं आहे. शिवाय प्रादेशिक संतुलनाचाही विचार करण्यात आलाय. दरम्यान, काँग्रेसच्या या 190 जणांच्या कमिटीत फक्त 17 महिलांना स्थान देण्यात आलं आहे आणि हे प्रमाण 9 टक्क्यांच्या आसपास आहे.

(Dr Pradnya Satav Emotional memory of Rajiv Satav After Appointment of Vice President Congress)

हे ही वाचा :

महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, राजीव सातव यांच्या पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.