Presidential election Result : रायसीनाच्या रेसमध्ये द्रौपदी मुर्मू आघाडीवर, खासदारांचे 540 मते मिळवली; यशवंत सिन्हांना किती मते?

Presidential election Result : सकाळी 11 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. आधी खासदारांची मते मोजण्यात आली. या पहिल्या फेरीत मुर्मू यांनी सर्वाधिक 540 मते घेतली आहेत. मुर्मू यांना यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळाली आहेत.

Presidential election Result : रायसीनाच्या रेसमध्ये द्रौपदी मुर्मू आघाडीवर, खासदारांचे 540 मते मिळवली; यशवंत सिन्हांना किती मते?
रायसीनाच्या रेसमध्ये द्रौपदी मुर्मू आघाडीवर, खासदारांचे 540 मते मिळवली; यशवंत सिन्हांना किती मते?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 3:31 PM

नवी दिल्ली: राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची (Presidential election Result) मतमोजणी सुरू झाली आहे. या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) आणि यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्यात थेट लढत आहे. सकाळी 11 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू या आघाडीवर आहेत. खासदारांच्या मतांची मोजणी पूर्ण झाली आहे. खासदारांच्या एकूण 748 मतांपैकी मुर्मू यांना 540 मते मिळाली आहेत. तर यशवंत सिन्हा यांना फक्त 208 मते मिळाली आहे. तर 15 खासदारांची मते बाद ठरली आहेत. रायसीना हिल्सच्या रेसमध्ये खासदारांची सर्वाधिक मते घेऊन द्रौपदी मुर्मू या आघाडीवर गेल्या आहेत. आता राज्यांमधील आमदारांची मतेही त्या खेचून घेतात का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, खासदारांचा कौल मुर्मू यांच्या बाजूने गेल्याने त्यांचा विजय जवळजवळ निश्चित मानला जात आहे.

सकाळी 11 वाजता मतमोजणीस सुरुवात झाली. आधी खासदारांची मते मोजण्यात आली. या पहिल्या फेरीत मुर्मू यांनी सर्वाधिक 540 मते घेतली आहेत. मुर्मू यांना यशवंत सिन्हा यांच्यापेक्षा दुप्पट मते मिळाली आहेत. पहिल्या राऊंडमध्येच मुर्मू यांनी सर्वाधिक मते मिळवल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे मुर्मू यांच्या गावात प्रचंड जल्लोष करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

आमदारांच्या मतांची मोजणी

आता संसदेच्या रुम नंबर 63 मध्ये आमदारांच्या मतांची मोजणी करण्यात येणार आहे. लवकरच हा निकालही अपेक्षित आहे. मतमोजणी संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुर्मू यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार आहेत. मुर्मू यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी भाजपच्या कार्यालयात जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. यावेळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित राहणार आहेत.

भाजपचा देशभर जल्लोष

मुर्मू यांच्या विजयानंतर भाजप देशभर जल्लोष साजरा करणार आहे. दिल्लीत विजय रॅली काढली जाणार आहे. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार विजयी झाल्यानंतर रॅली काढण्याची ही पहिलीच वेळ असेल. दिल्लीतील रॅलीचं नेतृत्व नड्डा करणार असून यावेळी ते भाषणही करणार आहेत. मात्र, या रॅलीत मुर्मू सहभागी होणार नाहीत. यावेळी 20 हजार लाडूंचं वाटप केलं जाणार आहेत.

बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.