Droupadi Murmu : नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं खरं नाव माहीत आहे का?; मुर्मू यांनीच सांगितला नावाचा किस्सा
Droupadi Murmu : मुर्मू यांनी ओडिशातील एका व्हिडीओ मॅगजीनला काही महिन्यांपूर्वी मुलाखत दिली होती. ओडिशासह राज्यातील अनेक भागात संथाली (Santhali) भाषा बोलली जाते. या भाषेनुसार त्यांचं नाव पुती (Puti) ठेवण्यात आलं होतं.
नवी दिल्ली: द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) या राष्ट्रपतीपदी निवडून आल्या आणि त्यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिला आदिवासी समाजातील राष्ट्रपती मिळाला आहे. त्यातही त्या राष्ट्रपती होणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला ठरल्या आहेत. या शिवाय स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती (president of india) ठरल्या आहेत. द्रौपदी मुर्मू राष्ट्रपतीपदी विराजमान होताच त्यांची जुनी इंटरव्ह्यू व्हायरल होत आहे. द्रौपदी हे आपलं खरं नाव नाही. हे नाव आपल्याला शाळेतील शिक्षिकेने दिलं होतं. महाभारतातील (mahabharat) द्रौपदीच्या नावावरून आपलं नाव द्रौपदी ठेवण्यात आल्याचं मुर्मू या मुलाखतीत सांगताना दिसत आहेत. त्याचा मुलाखतीत त्यांनी आपलं ओरिजिनल नावही सांगितलं आहे. तसेच अनेक आठवणींना उजाळाही दिला आहे. त्यांच्या राजकीय प्रवासावरही त्यांनी या मुलाखतीत प्रकाश टाकला आहे.
न्यूज एजन्सी पीटीआयने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मुर्मू यांनी ओडिशातील एका व्हिडीओ मॅगजीनला काही महिन्यांपूर्वी मुलाखत दिली होती. ओडिशासह राज्यातील अनेक भागात संथाली (Santhali) भाषा बोलली जाते. या भाषेनुसार त्यांचं नाव पुती (Puti) ठेवण्यात आलं होतं. हे नाव शाळेतील शिक्षिकेने बदललं. त्या ऐवजी महाभारतातील द्रौपदीवरून आपलं नाव द्रौपदी ठेवलं, असं मुर्मू म्हणाल्या. ही शिक्षिका मयूरभंजमध्ये शिकवायला येत होती. ती दुसऱ्या भागातील होतील, असंही त्यांनी सांगितलं.
नावच नाही, नावाची स्पेलिंगही बदलली
1960च्या दशकात मयूरभंज जिल्ह्यात शिक्षक नव्हते. त्यामुळे येथील मुलांना शिकवण्यासाठी बलसोर आणि कटक इथून शिक्षक येत होते. शिक्षिकेला माझं जुनं नाव आवडत नव्हतं. त्यामुळे त्यांनी बदलून टाकलं. त्यांच्या नव्या नावाची स्पेलिंगही आधी ‘Durpadi’ आणि नंतर ‘Dorpdi’ झाली असंही त्यांनी सांगितलं.
सर्वात तरुण राष्ट्रपती
मुर्मू यांनी सोमवारी देशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. सरन्यायाधीश एनव्ही रमण्णा यांनी त्यांना संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये शपथ दिली. मुर्मू यांच्या रुपाने देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळाला आहे. 64 वर्षीय मुर्मू या देशातील सर्वात तरुण राष्ट्रपती आहेत.
ओडिशाच जन्म आणि कर्म भूमी
1958 मध्ये ओडिशातील मयूरभंजमध्ये मुर्मू यांचा जन्म झाला. 1979 मध्ये त्यांनी भुवनेश्वरच्या रमादेवी कॉलेजमधून बीएची पदवी घेतली. त्यानंतर 1997मध्ये त्या राजकारणात आल्या. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याच वर्षी त्या नगरसेविका बनल्या. 2000मध्ये त्या रायरंगपूरमधून आमदार म्हणून निवडून आल्या. त्या ओडिशा सरकारमध्ये मंत्रीही होत्या. आमदार म्हणून त्यांनी उल्लेखनीय काम केलं. त्यामुळे 2009मध्ये त्यांना दुसऱ्यांदा विधानसभेत जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर 2015-2021 पर्यंत त्या झारखंडच्या राज्यपाल झाल्या.