71 कोटींचा बँक घोटाळा; वाचा, कोण आहेत आमदार अनिल भोसले!

शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. (ED arrests Anil Bhosale, know about ncp politician)

71 कोटींचा बँक घोटाळा; वाचा, कोण आहेत आमदार अनिल भोसले!
Anil Bhosale
Follow us
| Updated on: Mar 08, 2021 | 6:47 PM

मुंबई: शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसले यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी त्यांची आधीच येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. तब्बल 70 कोटी 78 लाखांचा हा घोटाळा आहे. त्याची व्याप्ती अजूनही वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घोटाळ्यामुळे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोट्यवधीचा घोटाळा करणारे भोसले नेमके कोण आहेत? याचा घेतलेला हा आढावा. (ED arrests Anil Bhosale, know about ncp politician)

कौटुंबीक पार्श्वभूमी

अनिल शिवाजीराव भोसले हे 47 वर्षाचे आहेत. ते पुण्यातील शिवाजी नगरात राहतात. त्यांचं शिक्षण बारावी पर्यंत झालं आहे. त्यांची पत्नी रश्मी भोसले या नगरसेविका आहेत.

कोट्यवधीची संपत्ती

भोसले यांनी 2004मध्ये त्यांची संपत्ती 2 कोटी 92 लाख 68 हजार दाखवली होती. त्यानंतर 2014च्या निवडणुकीत त्यांनी त्यांची एकूण संपत्ती 22 कोटी 1 लाख 8 हजार दाखवली होती, अशी सूत्रांनी माहिती दिली.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये, पुन्हा राष्ट्रवादीत

भोसले हे राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. 2017 मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत अनिल भोसले आणि अजित पवारांमध्ये रेश्मा भोसले यांना तिकीट देण्यावरून मोठा वादही झाला होता. त्यामुळे अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून गणल्या जाणाऱ्या अनिल भोसले यांनी त्यावेळी भारतीय जनता पक्षाशी घरोबा करण्यास सुरुवात केली होती. या वादानंतर त्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपमध्ये प्रवेश केला होता. परंतु, भाजपमध्ये त्यांचं मन काही रमलं नाही. काही दिवसानंतर त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला.

भोसले राष्ट्रवादीत, पत्नी भाजपच्या सहयोगी सदस्या

भोसले हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानपरिषदेवर निवडून आले. मात्र, नंतर त्यांच्या पत्नी रेश्मा या अपक्ष नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या सहयोगी सदस्य बनल्या.

चार अलिशान कार जप्त

भोसले यांच्या घरावर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पाच महिन्यांपूर्वी छापा टाकला होता. यावेळी त्यांच्या चार महागड्या आणि अलिशान गाड्या आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. लँड क्रुझर, टोयोटा कॅमरी सेडान या गाड्यांची किंमत 130 कोटी रुपये एवढी आहे. त्यांनी खरेदी केलेल्या आणखी १० ते १२ कार पोलिसांच्या रडारवर आहेत. त्याचबरोबर अनिल भोसलेंच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तांची माहिती गोळा करण्याचं कामही पोलिसांकडून सुरू आहे.

बँकेचं संचालक मंडळ बरखास्त

2016 पासून शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत गैरव्यवहार असल्याचा आरोप होत होता. एप्रिल 2019 मध्ये रिझर्व्ह बँकेने शिवाजीराव भोसले बँकेच संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासक नेमण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर राज्यात सत्ताबदल होऊन महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती आली. या बँकेत पैसे ठेवणाऱ्या ठेवीदारांमध्ये सोळा हजार ठेवीदारांमध्ये निवृत्त सैनिक, ज्येष्ठ नागरिक आणि हातावर पोट असलेल्या कामगारांचा प्रामुख्याने समावेश आहे.

काय आहे घोटाळा?

अनिल भोसले आणि त्यांची पत्नी नगरसेविका पत्नी रश्मी भोसले यांच्यासह 16 जणांवर शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. बँकेत 71 कोटी 78 लाखांचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. ऑडिटर योगेश लकडे यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जानेवारी महिन्यात फिर्याद दिली होती.

300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती

बँकेच्या रेकॉर्डमध्ये बनावट नोंदी खऱ्या दाखवून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एकूण 300 कोटींपर्यंत घोटाळ्याची व्याप्ती असल्याचा दावा केला जात आहे. उर्वरित 222 कोटींच्या घोटाळ्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. काही महिन्यांपूर्वी बँकेवर प्रसाशक नेमण्यात आला होता. त्यानंतर बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर निर्बंध घालण्यात आले होते. आता भोसले यांना ईडीने अटक केली आहे. (ED arrests Anil Bhosale, know about ncp politician)

सुभाष देशमुखांवरही ठपका

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत भोसले यांच्याबरोबरच तत्कालीन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला आहे. सुभाष देशमुख हे भोसले यांचे नातेवाईक असून त्यांनीच कारवाईला अडथळा केल्याचा आरोप याचिकेत केला आहे. (ED arrests Anil Bhosale, know about ncp politician)

संबंधित बातम्या:

शिवाजी भोसले सहकारी बँक गैरव्यवहार, राष्ट्रवादीचे आमदार अनिल भोसलेंना अटक

300 कोटींच्या बँक घोटाळ्याचा आरोप, राष्ट्रवादीच्या आमदारासह 16 जणांवर गुन्हा दाखल

बेळगावात पुन्हा एकदा भगवा फडकवण्याचा प्रयत्न , कानडींकडून कार्यकर्त्यांना अटक आणि सुटका; वातावरण तापणार?

(ED arrests Anil Bhosale, know about ncp politician)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.