‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर देशासमोरील मोठा प्रश्न’, पाटणकरांवरील कारवाईनंतर शरद पवारांचा घणाघात

गेल्या 5 - 6 वर्षात ही ईडी नावाची संस्था इथं बसलेल्या कुणाला माहिती नव्हती. मात्र आता ही ईडी गावागावात पोहोचलीय. या सगळ्या गोष्टीचा गैरवापर दुर्दैवानं सुरु आहे. बघू आता त्याला काही पर्याय निघतो का, अशा शब्दात शरद पवार यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर दिलीय.

'केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर देशासमोरील मोठा प्रश्न', पाटणकरांवरील कारवाईनंतर शरद पवारांचा घणाघात
पाटणकर यांच्यावरील कारवाईनंतर शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीकाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 22, 2022 | 7:21 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीनं मोठा दणका दिलाय. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची एकूण किंमत 6 कोटी 45 लाख इतकी असल्याची माहितीही ईडीकडून देण्यात आलीय. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे. ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न बनल्याची टीका पवार यांनी केलीय.

पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाईनंतर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशातील सर्वात मोठा प्रश्न बनलाय. आपण जी आकडेवारी दिली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छपणे सांगते की राजकीय किंवा अन्य हेतुनं कुणालातरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. खरं सांगायचं म्हणजे गेल्या 5 – 6 वर्षात ही ईडी नावाची संस्था इथं बसलेल्या कुणाला माहिती नव्हती. मात्र आता ही ईडी गावागावात पोहोचलीय. या सगळ्या गोष्टीचा गैरवापर दुर्दैवानं सुरु आहे. बघू आता त्याला काही पर्याय निघतो का’, अशा शब्दात शरद पवार यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर दिलीय.

शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

श्रीधर पाटणकर यांची 6.45 कोटीची मालमत्ता जप्त

उद्धव ठाकरेंना रात्री झोप लागणार नाही – सोमय्या

उद्धव ठाकरे माफिया सेनेनं जी लुटमार चालवली आहे. त्या लुटमारीचा हिशेब जनतेसमोर ठेवण्याचं काम मी करतोय. अजून तर ही सुरुवात आहे. पुढचा हिशेब येईल तेव्हा कळेल. किती मनी लॉन्ड्रिंग केलं हे श्रीधर पाटणकरांनी घोषित करावं नाहीतर पुढच्या कारवाईला तयार राहावं. ज्या कंपन्यांतून पैसे घेतले ते पैसे पुढे कुठे गेले? असा सवाल करतानाच उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही, असा खोचक टोला सोमय्या यांनी लगावलाय.

किरीट सोमय्या यांचे ट्वीट

इतर बातम्या :

ED Raid : ‘उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही’, मुख्यमंत्र्यांच्या मेहुण्यावरील ईडी कारवाईनंतर किरीट सोमय्यांची पहिली प्रतिक्रिया

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेव्हणे Shridhar Patanakar यांचा ED चा मोठा दणका! ठाण्यातील 11 फ्लॅट्स जप्त

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.